“खरंच सांगा गुरुजी (Guruji ) कोण कुठं चुकलं”

एक अडाणी बापने  गुरुजी (Guruji ) ला विचारले “खरंच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं”

खरंच सांगा गुरुजी ,कोण कुठं चुकलं.........शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi

खरंच सांगा गुरुजी (Guruji ),कोण कुठं चुकलं………

शाळेमध्ये पोरगं नेमकं काय शिकल !
कॉफ्या पुरवून शाळेच,काम तुम्ही खास केलं
दहावीच पोर माझ,झट्क्यात पास केलं

पोरासगट माझा,सत्कार जाहीर झाला
गाजावाजा गावभर झाला,माझ्या सह शाळेचे नाव त्यान राखलं
खरंच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं……

टक्केवारी वाढवून,पगार तुमची वाढली
पगाराची नशा,दारूसारखी चढली
आता पोरगं अकरावीत,भूगोल ,गणित पचेना
इंग्रजी तर सोडाच,मराठी ही वाचेना
परीक्षेच्या भट्टीत कच्च आम्ब पिकल
खरंच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं……..

अकरावीतून बारावीत तसाच तुम्ही रेटल.
कपडे घालून नाटावांनी नटल.
बारावीच्या नखऱ्याला खुदकन हसलं,
चार विषयात पोरग गळ्यइतके फसल ,
मायेने पदराखाली आम्ही त्याला झाकल .
खरच सांगा गुरुजी कोण कुठ चुकल ……….

शाळेसाठी पोरांच्या,नवं साल धरलं
विकु म्हणते आई त्याची,गळ्यातील डोरल.
शाळा शिकून पोरगं,लय लय मोठं होईन
आईच्या सप्नाला,सुखाच फुल येईल
सुखाच सपान डोळ्यांतच सुकल
खरंच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं…….

शाळला पोरांन,राम राम ठोकला
पुस्तकाचा ढिगारा,कीलोवर विकला
आता पोरगं हॉटेंलात,काम करू लागल
खंगलेल्या संसाराला धीर देऊ लागलं..

आयुष्याच्या प्रवासात कोण काय शिकल
खरंच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं
खरंच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं……..

guruji,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi
guruji

……ही असतात माणसं …..

माणसं जीवनाच्या वाटेवर साथ देतात
मात करतात.
हात देतात अन् घातही करतात
ही असतात माणसं……..!
व़ेड लावतात वेडही करतात
संधी देतात संधी साधतात
ही असतात माणसं……..!
वाट दाखवतात, वाट लावतात
घास भरवतात घास फिरवतातही असतात माणसं……..!!
शब्द पाळतात शब्द फिरवतात.
गळ्यात पडतात गळा कापतात
ही असतात माणसं……..!
दूर राहतात तरी जवळची वाटतात
वाईट वागतात तरीही चांगली वाटतात.
जवळ राहून ही परकी वाटतात.

ही असतात माणसं …..!!

…… मानवी देह …..

देह मानवी लाभला आहे,
चीज त्याच करायचं .
काळावर नाव कोराल्याशिवाय
उगाच नाही मारायचं
माय-बापाच्या मनामधून
एक हंगाम वावरतो
सुखी तोच घडू शकतो
स्वतःला जो सावरतो.

शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi

आम्हाला विश्वास आहे की, आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल आणि आम्हाला तुमचा पाठिंबा लाभेल आपल्या घरातल्या लहान मुलांना या गोष्टींचाआनंद द्या आणि . तुम्ही स्वतः घ्या सर्व मराठी बांधवांपर्यंत शोधमराठी हे संकेतस्थळ पोहोचवा…… धन्यवाद

click this link to join my WhatsApp group.

सर्व मराठी बांधवांचे  शोधमराठी या यूट्यूब चैनल वर स्वागत आहे……आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद..

Leave a Comment