मैत्रीचं बंध | True Friendship

|| मैत्रीचं बंध ( True Friendship )||

मैत्रीचं बंध
मैत्रीचं बंध

 

नातं …… किती महत्त्वाचा शब्द आहे ना आपल्या आयुष्यात…. नातं हे अनेक प्रकारचं असतं. माय लेकराचं, बहीण-भावांच तर निसर्ग मानवाच पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट ही नात्याशिवाय अधुरीच म्हणावी लागेल. असचं एक नातं असतं मैत्रीचं हो मैत्रीचंच….रातोरात रडवणारी, आसवांनी भिजवणारी हदयात नवं घर करणारी, ती फक्त एकच असते मैत्री न संपणारी प्रत्येक जण कोणाचा ना कोणाचा मित्र असतोच अगदी स्वत:पेक्षा आपल्या मित्रावर विश्वास दाखवणारी मैत्री आपल्या सर्वांची असतेच. ही मैत्री वेगवेगळया प्रकारची असू शकते. कुणाची प्राण्याशी तर कुणाची निसर्गाशी. पण खास असते ती दोन व्यक्तीची मैत्री म्हणजे काय ?

हे सांगण्याची गरज नाही कारण आपल्या अंर्तमनाला एवढेच सांगणे की, मैत्री ही हि-यासारखी चकाकणारं एक पवित्र नातं आहे. कळतनकळत आपल्या सुख दुःखात सामावणारी डोळयात पाणी आणणारी, मैत्री ही आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार आहे आणि आपण ते अनुभवतो व जगतोही. पण हे सर्व कळतं केंव्हा जेव्हा आपल्यात दुरावा निर्माण होतो तेव्हा तेव्हा कळत की मैत्री म्हणजे काय ? या जीवनावर स्वार होताच गरज भासते ती अशा व्यक्तीची. जी आपल्याला समजू शकेल. आपल्या मनातील उलथापालथ समजू शकेल आणि अशी व्यक्ती की आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करू शकू तेही निर्धास्त…. जेणे की आपलं मन हलकं होण्यास मदत होईल. आपल्या वाईट गोष्टी दाखवण्या बरोबरच आपल्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा करेल…

अगदी त्याच्या स्टाईल मध्येमला सांगायचं काय, तर मैत्री ही फक्त सुख–दुःखातच असते अस नाही तर… जे मूल मुली शिक्षणासाठी घरापासून लांब आहेत ना त्यांना विचारा मैत्री म्हणजे काय ते. आई वडिलांची तसेच घरची पोकळी भरून काढण्याचं काम हे मैत्री रूपी पवित्र नातच करतं. आपल्या आयुष्यात अनेक मित्र असावेत पण एक मित्र असा असावा ‘आरशा’ सारखा म्हणजेच आपलं प्रतिबिंब दाखवेल व डोळयात अंजन घालेल असा असावा. या मैत्रीत स्वार्थ नसावा, गैरसमजाला तर थोडीही मोकळीक नसावी.

सूर्याला मानवाचा मित्र म्हणतात का बरं… तर तो नुसता देत असतो. किंवा दुस-याने देण्याची अपेक्षा ठेवत नसतो. सूर्याचा आदर्श डोळयासमोर ठेवून आपली मैत्री असावी, तुम्ही श्रीकृष्ण व सुदयाम्याची मैत्री पाहिली असेल, ती पोहयाची पुरचुंडी त्यातील प्रेम आठवतंय ना! असं असतं मैत्रीचं नातं. मैत्री ही आंधळयाचा पाय, वात्स्ल्याची गाय, दुधावरची साय, अशी मैत्री तुमच्या माझ्या मित्रप्रेमाची साक्ष आहे. मैत्री हा धागा नाही, जो ताणल्याने तुटेल मैत्री हा दीप नाही, जो वा-याच्या झुळकीने विझेल मैत्री आहे दोन जिवांचा विश्वास जीवन जगण्यासाठीचा श्वास. या नात्यामध्ये कधीच आडपडदा नसतो. अगदी आपले वैचारिक मतभेद झाले तरी आपण भांडतो, शिव्या देतो पण त्यामध्येही आपले प्रेम असतं. सुखात – दुःखात अगदी आपल्या प्रत्येक क्षणात साथ देणारा आई नंतर मित्रच असतो.

उगाच का कृष्ण सुदाम्याची जोडी एवढी फेमस आहे….. मैत्रीची अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. पण हा मानवच हे मैत्रीचं नातं टिकवतो असे नाही बर कां.निसर्गाशी अगदी प्रत्येक सजीव मैत्रीच नात टिकवत. कालचच उदाहरण पहा ना.. एक माकड दुस-या माकडला मरणाच्या दाढेतून वाचवत…. .तिथे फक्त मैत्रीरूपी भावनाच होती ना….. एवढे कशाला सांगत बसलोय मी….. आठवून पहा ना आपली लहानपणाची मैत्री….. खेळ, मस्ती, अभ्यास, शाळा, कोण विसरंल ही मैत्री. लहानपणा पासून एकमेंकाच्या हातात हात धरून तुरू तुरू चालण्या पासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत साथ देते ती मैत्री.

आपण ठरवून कधी मैत्री करत नाहीत….. गरीब श्रीमंत, जात धर्म कधी त्याचा परिणामही मैत्रीवर होत नाही….. अगदी लहानपणी जर आपल्याला कोणी एखादी गोष्ट सांगितली तर ती पटणार नाही. पण मित्रांने सांगू द्या आपला लगेच विश्वास बसेल…..खरंच खूप सुंदर नातं आहे मैत्रीचं मी ही अनुभतोय, अनुभवत आलोय…… जाता जाता एवढच सांगेन बाबानो मैत्री जपा. फक्त मैत्री जपू नका तर त्या मैत्रीचा वटवृक्ष करा….. समोरच्यालाही हेवा वाटेल अशी मैत्री करा… खूप सुंदर नातं आहे.

Leave a Comment