मराठी पाऊल पडते पुढे.. | Marathi Paul Padate Pudhe..

|| मराठी पाऊल पडते पुढे.. ||

मराठी पाऊल पडते पुढे
मराठी पाऊल पडते पुढे

ज्ञानेश्वरांनी विद्वानांना रोख प्रश्न विचारला की, भारतात प्रत्येक राज्यास स्वतंत्र एक अशी भाषा अस्तित्वात आहे. ही भाषा त्या प्रदेशातील बोलणा-या लोकांच्या प्रमाणावरून ठरली आहे. प्रत्येक राज्याची भाषा ही त्या राज्याची राजभाषा आहे. उदा. गुजरातमध्ये – गुजराथी, पंजाबमध्ये पंजाबी, महाराष्ट्रात मराठी, आंध्रप्रदेशात तेलगु भाषा आढळुन येते. आपल्या राष्ट्रगीतात देखील या राज्यांच्या भाषेचा उल्लेख आढळतो.

“जन-गण-मन अधिनायक जय है,
भारत भाग्यविधाता ।
पंजाब, सिंध, गुजरात, मराठा
द्राविड उत्कल बंग।”

वरील ओळींवरून त्या राज्याच्या भाषेवरून त्या राज्यांना नावे पडलेली दिसून येतात. यारून भाषेचे महत्त्व सहज आपल्या लक्षात येते. पण प्रत्येक राज्यात आपापली भाषा वापरली जात असली तरी अपवाद ठरत आहे. महाराष्ट्र राज्याची मुख्य प्रादेशिक भाषा म्हणजे ‘मराठी’. ‘मराठी’ हा शब्द उच्चारला म्हणजे महाराष्ट्राचा नक्शा आपल्या डोळ्यामोर सहज उभी राहते. पानिपतचे महायुद्ध आठवते. युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. पंधराव्या-सोळाव्या शतकात मराठीवर मुस्लिम राजवटीचे आक्रमण झाले होते. एका विशाल आक्राळ विक्राळ राक्षसांच्या पायाखाली बिचारा निष्पाप मराठी तुडवला जाणार होता पण मराठीचे सुदैव राजमाता जिजाऊ यांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. या शिवरायांनीच पुढे मराठीचे एक स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यामुळे मराठीचे अस्तित्व नष्ट होण्यास सुरूवात झाली असतानाच शिवरायांच्या रूपाने मराठीचा सुर्योदय झाला परिणामी मराठीला एक आगळे-वेगळे स्थान प्राप्त झाले.

या अगोदरच मराठीचा प्रारंभ झालो होता. तो काळ म्हणजे अकरा ते तेरावे शतक. या काळात अनेक संत होऊन गेले. त्यांनी आपल्या ग्रंथांद्वारे मराठीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. संत ज्ञानेश्वरांनी तर ‘मराठी’ भाषेला अमृताहूनी गोड सांगितले. पण त्या काळात मराठीला मानायला तयार नव्हते. संस्कृतचा पगडा त्या काळात भारी होता. मराठीचे संवर्धन करण्याची

“संस्कृत ब्रह्मवाणी केली प्राकृत (मराठी) काय चोरापासून आली. ”

या ओळींवरून आपल्याला ज्ञानेश्वरांची मराठी विषयीची आस्था सहज लक्षात येते. पणे खरे पाहता मराठीला खरे यश मिळाले ते ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात. यानंतर इ.स. १८१८२ नंतर मात्र मराठीचे दुर्दैव पुन्हा सुरू झाले.स्वातंत्र्यानंतर देखील मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला. पण अनेक मराठी वीरांनी ‘मराठी’ भाषेला एक वेगळे स्थान मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची ? आहूती दिली. आणि त्यांच्या या आहूतीला पुढे यश मिळाले. मराठी भाषेच्या दृष्टीने तो सुवर्ण दिन उजाडला.

तो सुवर्णदिन म्हणजे १ मे १९६० हा दिवस होय. हाच 1 दिन ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. त्यामुळे मराठी भाषा असलेली ‘महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या काळात विविध कवी, कलावंत, लेखक, नेते यांनी मराठी भाषेचा झेंडा रोवला. कवी कुसुमाग्रज, ययातीकार व ज्ञानपीठ पुरस्कर्ता दि. स. खांडेकर तसेच दादा कोंडके यांनी मराठी भाषेला एका वेगळ्या उंचीवर ” नेऊन ठेवले. एकविसाव्या शतकात मात्र या भाषेचे दुर्दैव उजेडात येवू लागले. विविध प्रश्नांबरोबर या आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनाचे प्रश्न डोळ्यासमोर दिसू लागले. विविध प्रांतातील लोकांनी या भाषेवर आक्रमण करण्या सुरूवात केली. परिणामी मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेक प्रश्न निर्माण करण्यास सुरूवात झाली. विशेष म्हणजे इंग्रजीचा वाढता प्रभाव मराठीच्या अस्तित्वास कारणीभूत ठरू लागली आहे. ही भाषा मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात घुसू पाहत आहे.

“मराठी भाषेत बी झालीय मिसळ । कर्ता, कर्म सारं इंग्रजीत दिसलं । क्रियापदापुरती मराठी असल ||

या वरील ओळींवरून मराठीची अवस्था सहज लक्षात येते. आज प्रत्येकजण मराठी भाषा बोलताना इंग्रजी, शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. परिणामी मराठी भाषेची भेळ, चिवडा झालेली आहे.मराठीचे संवर्धन करण्याची वेळ आता महाराष्ट्र वासीयांवर आली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी .मराठमोळ्या लोकांना जागे होणे गरजेचे ठरले आहे. छत्रपती शिवरायांचे नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून मराठीचे स्थान अढळ केले पाहिजे. मराठी भाषेचा वापर संगणक बरोबर विविध क्षेत्रात करणे गरजेचे आहे. मराठी बोला, मराठी वाचवा’ असा नारा महाराष्ट्र वासीयांध्ये रूजवणे आवश्यक आहे. तरच मराठी भाषेचे संवर्धन शक्य होईल. नाहीतर ‘मराठी भाषेचे संवर्धन’ हा एक चिंतेचा विषय निर्माण होईल.

Leave a Comment