Torna Fort | तोरणा किल्ला

Torna Fort | तोरणा किल्ला

torna fort | तोरणा किल्ला ,शोधमराठी,शोध मराठी,Shodh marathi

तोरणा (torna fort) सह्याद्री पर्वतरांगा मधील एक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या दोन्ही बाजूने सह्याद्री पर्वत रांगा असून गिरीदुर्ग या प्रकारात येतो याच पर्वतरांगामध्ये रायगड आणि राजगड हे किल्ले सुद्धा येतात. तोरणा (torna fort) किल्ल्याला प्रचंड गड म्हणून सुद्धा ओळखले जाते.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात हाच किल्ला जिंकून आपल्या स्वराज्याचे तोरण बांधले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन १६४७ मध्ये हा किल्ला जिंकला आणि हा स्वराज्य मधील हा पहिलाच किल्ला असल्यामुळे मराठा साम्राज्याचा हा केंद्रबिंदू होता.

या किल्ल्याचे बांधकाम करताना कामगारांना या किल्ल्यावर सोन्याच्या मोहरांचे २२ हांडे सापडले होते.या धनाचा वापर हा आपले स्वराज्य चालवण्यासाठी राजाने केला . असे म्हटले जाते की त्या काळात या किल्ल्याची बांधणी करण्यासाठी पाच हजार दोन इतका खर्च आला होता. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या ताब्यात गेला होता. पण मराठा साम्राज्यातील शूर व्यक्तीने तो परत जिंकून आपल्या मराठा साम्राज्यात कायमस्वरूपी समीर केला.

किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणी

  •  तोंरजई देवी मंदिर :-

तोरणा (torana) किल्ल्याच्या कोठे दरवाजा समोर हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. असे मानतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सोन्याच्या मोरांनी भरलेले 22 हंडी मिळाले होते म्हणून त्या ठिकाणी या तोंरजई देवीचे मंदिर बांधले आहे.

  • झुंजार माची :-

दिंडी दरवाज्याच्या खाली आपल्याला झुंजार माची पाहायला मिळते ही झुंजार माझी हनुमान बुर्जाच्या जवळ आहे झुंजार माची कडे जाणारा मार्ग खूप कठीण आहे आणि पावसाळ्यात या माचीकडे जाणे हे खूप धोकादायक ठरू शकते आपण ही माझी पावसाळ्यामध्ये न पाहता उन्हाळ्यामध्ये पाहू याचा आनंद घेऊ शकता.

  • मेंगाई देवी मंदिर

वेल्हे गावांमधील लोक या देवीला खूप मानतात या गावातील लोक नवरात्र उत्सव याच मंदिरामध्ये साजरी करतात हे तोरणा (torna fort) किल्ल्यावरील रात्रभर मुक्काम करण्यासाठी योग्य ठिकाण आहे आपण कधी तोरणा (torna fort) किल्ल्यावर मुक्काम करण्याचे ठरवले तर आपण या मंदिरात मुक्काम करू शकता .

  • तोरणेश्वर मंदिर

तोरणेश्वर मंदिर हे महादेवाचे मंदिर होते पण ते आपल्याला तोरणा किल्ल्यावर पाहायला मिळत नाही त्या मंदिराचे काही अवशेष आजही निर्णय आहे देवीच्या मंदिराच्या भोवती पहायला मिळतात.

  • बुरुज

बुरुज म्हणजे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकाण होईल हे प्रत्येक गड किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते गडाच्या प्रत्येक बाजूला एक तरी बुरुज असतो तसेच या किल्ल्यावर ही आपल्याला काही बुरुज पाहायला मिळतात त्याचे नावे खालील प्रमाणे…
हनुमान बुरुज
सकेली बुरुज
भेळ बुरुज
फुटा बुरुज

  • बुधाळा माची

तोरणा किल्ल्याच्या पश्चिमेला आपल्याला बुधाळा माझी पहायला मिळते याच माजीच्या शेवटी पायरी दरवाजा आहे तसेच या माचीवर भगत दरवाज्याचा रस्ता आहे भगत दरवाजातून आपल्याला राजगडावर जाण्याचा मार्ग दिसतो.

तर मित्रांनो आपण तोरणा गडाविषयी माहिती पाहिली आहे या लेखांमध्ये तुम्हाला तोरणा किल्ल्याविषयी की माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा..

अशाच नवनवीन लेखसाठी शोधमराठी शी जुळलेले राहा. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद..

2 thoughts on “Torna Fort | तोरणा किल्ला”

Leave a Comment