भगवंताच्या नामातच खरे सुख (sukh) आहे.| Best Marathi Story

भगवंताच्या नामातच खरे सुख (sukh) आहे. आपण या कथेतून पाहू.

सुख ,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi

खूप वर्षा पृवीची गोष्ट आहे .एकदा एक महान साधू महाराज तीर्थटन करत असताना गावोगावी फिरत असताना. एका दूर च्या गावामध्ये गेले होते. साधू महाराजांना राहण्यासाठी ठिकाण शोधात होते. त्या गावाबाहेर एक मारुतीचे देऊळ होते.त्या ठिकाणी राहायचे  त्यांनी ठरवले व त्या देवळात साधू महाराज राहू लागले.गावातील बरेच नागरिकांशी त्याचा परिचय झाला. हळूहळू गावातील मंडळी साधू महाराजांकडे आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागली होती. प्रतिदिन येण्या-जाण्या  मुळे गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली होती. काही लोकत्यांना अध्यात्मा विषयक शंका विचारू लागले.काही लोक त्यांना आपल्या  प्रपंचातील अडचणी सांगू लागले.

प्रत्येक जण आपली अडचण साधू पुढे मांडू लागला. साधू महाराजही त्या सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करू लागले.लोक त्यांच्या उत्तरांनी समाधानी व्हायचे लोक त्यांना आदर द्यायचे ते काही वेळा एखाद्या विषयावर साधू महाराज प्रवचनही करत होते. त्यांच्या प्रवचनासाठी खूप लोक जमा होत. एके दिवशी गावातील काही मंडळी साधू महाराजांकडे आपल्या अडचणी घेऊन जमली असता साधू महाराज त्यांना प्रवचन देऊ लागले होते . ते आपल्या प्रवचनातून म्हणाले कि बाबांनो प्रपंचामध्ये कधी कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही. म्हणून आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत आपले समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा.आणि भगवंताचे नाम घ्यावे भगवंताची निरपेक्ष सेवा करावी यातच खरे सुख (sukh)आहे. यातच आपले समाधान आहे.

त्यांचे ते बोलणे एकूण एक ग्रहस्थ एकदम चिडून उठला आणि साधू महाराजांना मनाला प्रपंचामध्ये समाधानी राहावे ,ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत आपले समाधान टिकवावे.असे सांगायला काय जाते पण ते शक्य आहे का ? आता  माझंच  बघा माझा एक मुलगा बारा वर्षाचा आहे त्याची अजून मूंज व्हायची बाकी आहे. त्याचे पैस्यामुळे शिक्षण अर्धवट झाले आहे. सर्वात मोठी मुलगी वीस वर्षाची आहे तरी तिचं लग्न जमा नाही.तिच्या लग्नासाठी पैसा कोठून आणायचा व मोठा मुलगा ही अविवाहित आहे. त्याला कोणी मुलगी देत नाही .तो कोणतीही नोकरी किंवा काम करत नाही.या तीनीही मुलांच्या काळजीने बायको खंगत चालली आहे.ती सारखी आजारी असते. तिला औषध पाणी करावे लागते या सर्वांसाठी माझी मेहनत अपुरी पडते.कारण घरात कमवणार फक्त मी एकटा आहे.अशा परिस्थितीत काळजी करू नको तर मी काय करू.

तुम्हीच यावर काहीतरी सांगा.साधू महाराजांनी त्या गृहस्थाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतली नंतर ते हसून त्यांना म्हणाले काळजी करू प्रपंचाची प्रश्न सुटतात का? नाही ना. आज पर्यंत आपण काळजी आलात हे कळून सुद्धा आपल्याला असे वाटत नाही की आत्तापर्यंत केली तेवढी काळजी पुरे काळजी करण्यापेक्षा मनाचे समाधान जर ऐकवले आणि चित्त भगवंताच्या नामावर केंद्रीय केले तर मार्ग सापडण्याची शक्यता जास्त असते. भगवान सर्व शक्तिमान असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत यासाठी जास्तीत जास्त वेळा भगवंताचे स्मरण करण्यात घालवावा. हे सर्व ऐकल्यावर त्या ग्रहस्थाला आपली चूक समजली त्यांनी महाराजांना क्षमा मागितली.

त्याच्या लक्षात आले कि भगवंताच्या नामातच खरे सुख (sukh) आहे.

तात्पर्य:- मनाचे समाधान जर टिकवायचे असेल तर नामावर मन केंद्रीत केले पाहिजे काळजी केल्याने कुठलाही प्रश्न सुटत नाही यासाठी जास्तीत जास्त वेगळा नामस्मरणात घालवावा.

या शोधमराठी लेखात  समावेश करण्यात आलेल्या बोधकथांद्वारे मुलांमध्ये नैतिक मूल्ये विकसित होण्यास आणि त्या मूल्यांची जोपासना होण्यास निश्चितचमोलाची मदत होणार आहे.या गोष्टीतील कथेमध्ये काही ना काही संस्कार दडलेला आहे, त्याचा तुम्हां सर्वानांच लाभ होईल . या कथा तुम्ही आवडली कि  इतरांनाही पाठवा. या कथेतून आपण आपल्या  जीवनात चांगला उपयोग करावा, एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आपल्या प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा.  तसेच तुमचे आमच्या  शोधमराठी  या यूट्यूब चैनल एक वेळेस नक्की भेट द्या …

click this link to join my WhatsApp group.

 

Leave a Comment