गुरू शिष्याचे अनोखे नाते | Guru Shisyache Anokhe Nate…

|| गुरू शिष्याचे अनोखे नाते ||

गुरू शिष्याचे अनोखे नाते
गुरू शिष्याचे अनोखे नाते

गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णू गुरूदेवो महेश्वरा ।
गुरूसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरूवे नमः

अशाच आपल्या दररोजच्या म्हणजेच गुरू शिष्य यांच्या नात्याबदद्ल मी लिहित आहे.भारतीय संस्कृती जगभरामध्ये महत्त्वाची मानली जाते. कारण भारतीय संस्कृतीने जगाला आध्यात्मिक शिक्षण, मेडिकल अवकाशशास्त्र, संस्कार अशा अनेक मौल्यवान गोष्टींची ओळख प्रदान केली आहे.शिक्षण हे समाजाभिमूख असावे असा संदर्भ भारतीय महाकाव्यामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर गुरू आणि शिष्य यांचा संबंध कसा असावा याचे विश्लेषण करून सांगितले आहे.महाराष्ट्र राज्याने भारतीय संस्कृतीचा वारसा अधिक कल्पकतेने आणि प्रभावीपणे मांडलेला आहे. आपल्या राज्यामध्ये माऊली ज्ञानेश्वर त्यांचे गुरू निवृत्तीनाथ यांचे गुरू शिष्याचे संबंध आपण सर्वजण जाणतो आहोत.

शिक्षण व्यवस्था बदललेली आहे. काही कालावधीपूर्वी भारतीय शिक्षण प्रणाली शिक्षक केंद्रीत होती. आता मात्र ती विदयार्थी केंद्रीत बनली आहे. अर्थातच या व्यवस्थेचा समाजासाठी कितपत फायदा होईल ते तर वेळेच ठरवेल. परंतु मला असे वाटते की गुरू आणि शिष्य या नाण्याच्या दोन बाजू असून त्यातील कोणतीही बाजू खोटी ठरली तर ते ध्येय साध्य होत नाही.

प्रथमतः हा विषय मांडताना मला पडलेले दोन प्रश्न! मुख्यतः जाणवतात की,

“विदयार्थ्याच्या मते शिक्षक कसा असावा?
शिक्षकांच्या मते विदयार्थी कसा असावा?”

कारण यांचे उत्तर हे परिस्थिती आणि वेळेनुसार नक्कीच बदललेले असते.क्लासमध्ये शिक्षक शिकवत असताना विदयार्थ्यांनी लक्ष दयावे, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दयावीत, टॉटिंग व कमेन्टस न करता बेसिक कनसेप्ट क्लेअर कराव्यात.खरेतर शिक्षकांनी विदयार्थ्यांचा शिक्षक म्हणण्यापेक्षा आपला मित्र समजावा. त्याच्यावर फक्त Assignment चे ओझे न टाकता त्याला विचार करण्याची, त्याची कल्पकता वापरण्याची संधी उपलब्ध करून दयावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण हे रोजगार मिळविण्याचे साधन आहे हे न पाहता दुस-यांना मिळणा – या ज्ञानाचा आनंद पहावा व स्वतः ओळखण्याचे साधन आहे हे पटवून दयावे.

आज २१व्या शतकामध्ये आपण सर्वजण वावरत आहोत. माहिती व तंत्रज्ञानाने या शतकामध्ये खूप प्रगती केली आहे. Internet & Social Sites च्या माध्यमातून जग शिक्षक संबंध वृध्दिगंत संघटित होण्यास मदत होते.१९६४च्या कोठारी आयोगाने मांडलेल्या Educational Pattern मध्ये सुध्दा शिक्षक विदयार्थी यांचा संबंध कसा असावा यांचा आढावा शैक्षणिक माध्यमातून दिसून येतो. ठरविलेली उद्दिष्टये साध्य करावायाची असल्यास त्या मूल्यांचा आदर केला पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार केला असता शिक्षक हे फक्त शिकवणे व विदयार्थी हे ऐकणे एवढेच अपेक्षित नसून विदयार्थ्यांचा सर्वागीण विकास होणे गरजेचे आहे.

मला फक्त एवढंच म्हणायचं की,“शाळा किंवा कॉलेज हे मंदिराप्रमाणे आहे. “ज्याप्रमाणे चिखलाच्या गोळयाला आकार देवून कुंभार मडके घडवितो.त्याप्रमाणेच शिक्षक हे विदयार्थ्यांना योग्य ज्ञान देवून जबाबदार आदर्श भारतीय नागरिक घडवितात.

So, A Teacher is like a winter,
While it’s showing hard outside,
Keeping students comfortable,
As a warm and helpful guide. 
Thanks

 

 

Leave a Comment