सकारात्मक मराठी बोधकथा | Moral Stories In Marathi

|| सकारात्मक मराठी बोधकथा ||

सकारात्मक मराठी बोधकथा
सकारात्मक मराठी बोधकथा

कलेची जोपासना ही तपश्चर्याच

सकारात्मक मराठी बोधकथा
सकारात्मक मराठी बोधकथा

प्रगती विद्यालयात आठवीत शिकणारा अजय त्याचे चित्रकलेचे शिक्षक श्री. पेंडसे यांच्यासमोर मान खाली घालून उभा होता. आज त्याने प्रथमच त्यांना ‘यापुढे मी शाळेच्या भित्तिपत्रकांसाठी चित्रे काढणार नाही’ असे सांगितले होते. ते ऐकून पेंडसे सरांना मोठे नवल वाटले. अजय हा एक हुशार विद्यार्थी होता. लहानपणापासून त्याला चित्रकलेची मनस्वी आवड होती. हा पुढे उत्तम चित्रकार होईल हे ओळखूनच पेंडसे सरांनी अजय चौथ्या इयत्तेत असल्यापासून त्याच्यावर विशेष लक्ष ठेवले होते. त्याला चित्रांचा सराव व्हावा म्हणून ते त्याच्याकडून टिळक जयंती, गांधी जयंती, स्वातंत्र्यदिन, दसरा, रक्षाबंधन अशा विशेष प्रसंगी शाळेच्या फलकावर लावण्यासाठी चित्रे काढून घेत. त्या चित्रांचे सर्वजण कौतुक करीत. चित्र काढताना त्याचा उत्साह बघण्यासारखा असे. सरांनी दिलेले प्रत्येक काम ज्याने मनः पूर्वक केलेले होते, तोच अजय आज चित्र काढण्यास नाही म्हणत होता.

शेवटी या नकारामागे काय रहस्य दडले आहे ते जाणून घ्यावे म्हणून पेंडसे सरांनी त्याला जवळ घेतले. मोठ्या मायेने. त्याच्या हात फिरवला व म्हणाले, “काय झालंय ते सांगशील?” अजय म्हणाला, “माझ्या वर्गातली मुलं माझ्या चित्रांना नावं ठेवतात. त्या चित्रांमध्ये अनेक दोष दाखवतात. पेंडसे सरांनी याला उगीचच डोक्यावर चढवून ठेवला आहे असं म्हणतात. त्यामुळे मला वाईट वाटतं.” ते ऐकून सर हसले. त्यांनी अजयला वर्गात पाठवले,त्यांनतर दोनच दिवसांनी आठवीच्या वर्गावर पेंडसे सरांचा तास होता. त्या दिवशी वर्गात प्रवेशताच सर. म्हणाले, “आजचा तास जरा वेगळ्या स्वरूपाचा आहे.” ते ऐकून मुलेही सरसावून बसली.

त्यानंतर त्यांनी अजयने काढलेले एक चित्र फळ्यावर लावले व म्हणाले “मुलांनो, हे, अजयने काढलेले गणपतीचे चित्र आहे. यात तुम्हाला काय काय दोष दिसतात ते सांगा.” तेव्हा काही मुलांनी त्यातील दोष सांगितले ते सरांनी फळयावर लिहीले व त्यापुढे त्या-त्या मुलांची नावेही लिहिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्यापैकी प्रत्येकाला फळ्याजवळ बोलावले आणि त्यांना रंग कामाचे सर्व साहित्य देऊन ते दोष सुधारण्यास सांगितले. पण एकालाही ते धाडस झाले नाही. तेव्हा सर म्हणाले, “पाहिलंस अजय, दोष दाखवायला सर्वच पुढे येतात, पण ते सुधारण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. म्हणून आपलं काम सोडू नये. कलेची जोपासना ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे. तीत अनेक अडचणी येतील तरी डगमगू नये. या खंबीर प्रयत्नांतच भविष्यातील यश दडलेलं असतं..’ ते ऐकून अजयला मोठा हुरूप आला, तर वर्गातील इतर मुलांची तोंडेच बंद झाली.

कर्तव्यनिष्ठा

सकारात्मक मराठी बोधकथा
सकारात्मक मराठी बोधकथा

लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते तेव्हाची गोष्ट. एके दिवशी त्यांचा एक मित्र त्यांना भेटायला आला. चहापानानंतर शिळोप्याच्या गप्पा चालल्या असताना तो मित्र शास्त्रीजीना म्हणाला, ‘मला तुम्हांला एक प्रश्न आहे. विचारू का?” त्यावर शास्त्रीजी म्हणाले, “खुशाल विचार.” मित्र म्हणाला, “तुम्ही पंतप्रधान, आहात. अहोरात्री देशाची सेवा करता. अशा वेळी कोणी तुमचा सत्कार करून कार्याचा गौरव करायचा असे ठरवले तर तुम्ही ते टाळता असे का? आपल्या कार्याबद्दल लोकांनी प्रशंसा केली तर त्यात काय वावगे आहे? उलट तो तुमचा अधिकारच आहे. तरी प्रसिद्धिपराङमुख राहू नका.”

ते ऐकून शास्त्रीजी म्हणाले, “मित्रा, मी आजपर्यंत कर्तव्यच श्रेष्ठ मानले आहे. आहे. अधिकार अधिकार नाही. सत्कारसमारंभात वेळ घालविण्यापेक्षा तोच वेळ लोककल्याणासाठी घालविण्यास मला केव्हाही आवडेल.. मी अलिप्त राहिलो तरच खऱ्या अर्थाने माझे कार्य कर्तव्य पार पाडू शकेन. प्रसिद्धिीची लालसा कर्तव्यात बाधा आणते असे माझे स्पष्ट मत आहे. आपल्या मातृभूमीची सेवा करायला मिळणे यासारखी भाग्याची गोष्ट नाही. म्हणूनच ती मुकाट्याने करावी. तिचा गाजावाजा नको. ताजमहालसारखी वास्तू कितीही सुंदर असली तरी ती कशावर उभी आहे याचा विचार करावा आणि आपण पायाचे दगड व्हावे.

त्यावरच देशाचा ताजमहाल टिकून राहतो.” ते ऐकून त्या मित्राचे हृदय भरून आले. देशाचे एक उच्च पद भूषविणारे शास्त्रीजी आचार-विचारांनी किती श्रेष्ठ आहेत हे जाणून त्याच्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढला, मित्र हो! शास्त्रीजींसारखी असंख्य गुणवान माणसे आपल्या देशाला लाभली म्हणूनच आज आपली एवढी प्रगती झाली आहे.

देशाला कमीपणा आणू नका

सकारात्मक मराठी बोधकथा
सकारात्मक मराठी बोधकथा

मोठेमोठ्या रजपूत राजांनीही अकबरासमोर माना झुकवल्या होत्या, पण महाराणा प्रतापने त्याचे आधिपत्य कधीही स्वीकारले नाही. अकबराच्या सेनेने चितोडवर कब्जा केल्यानंतर राणा प्रताप आपल्या कुटुंबीयासमवेत अरवली पर्वतात भटकत फिरत होता. त्याच्यासमवेत त्याची मुलेबाळेही कष्ट झेलीत होती. त्यांना तीन-तीन, चार-चारदिवस अनपाणीही मिळत नसे डोक्यावर सतत शत्रुभयाची टांगती तलवार होती. त्या वेळी राणा। प्रतापची मुलगी चंपा वर्षांची होती तर अकरा मुलगा चार वर्षांचा होता. एके दिवशी तो भुकेने रडून रडून झोपला तेव्हा चंपाने त्याला आईपाशी आणले. त्या वेळी वडिलांना चिंतामग्न पाहून तिने विचारले, “बाबा, काय झाले? तुम्ही असे चिंतित का?” तेव्हा महाराणा म्हणाला, “मुली, आज आपल्याकडे एक पाहुणा आला आहे आणि त्याला खूप भूक लागली आहे.

आज पर्यंत या राणाकडे आलेला एकही अतिथी कधीही उपाशीपोटी गेला नाही पण आज ती वेळही मूर्च्छा आली. महाराणाला आपल्या मुलांचे कष्ट पाहवले आली.” तेव्हा चंपा म्हणाली, “बाबा, काळजी करू नका. आपल्याकडून अतिथी उपाशी जाणार नाही. काल मला तुम्ही दोन रोट्या दिल्या होत्या. भावाला भूक लागली तर खाऊ घालता येईल म्हणून मी त्या जपून ठेवल्या आहेत. पण तो तर झोपला आहे. तेव्हा तुम्ही त्या रोट्या अतिथीला द्या. असे म्हणून तिने दगडापाशी ठेवलेल्या त्या दोन्ही रोट्या आणल्या आणि त्यांवर चटणी घालून त्या अतिथीस खाऊ घातल्या, अतिथि निघून गेल्यानंतर उपासमारीमुळे चंपाला मूर्च्छा आली महाराणा आपल्या मुलांचे कष्ट पाहवले

नाहीतत्याने काळजावर दगड ठेवला आणि तुमचे आधिपत्य मान्य आहे’ अशा आशयाचे पत्र बादशहा अकबराला लिहिले. थोड्या वेळाने चंपा शुद्धीवर आली. तेव्हा तिला कवटाळून महाराणा रडत रडत म्हणाला, “या उपासमारीने आणि सततच्या कष्टाने तुझी काय दशा झाली आहे! मला हे दुःख पाहवत नाही. आता हे दिवस सरतील आणि पुन्हा सुखाचे दिवस येतील. मी अकबराला तसे पत्रच लिहिले आहे.

ते ऐकून चंपा म्हणाली, “बाबा, हे तुम्ही काय सांगता? आम्हांला वाचवण्यासाठी तुम्ही अकबराचे दास होणार ? आपल्या सर्वांना आज ना उद्या मरायचेच आहे. मग जगण्यासाठी एवढा आटापिटा कशाला? आता आमचे काहीही होवो, तुम्ही देशाला कमीपणा आणू नका. देश आणि धर्माच्या गौरवशाली परंपरेचे रक्षण करण्यासाठी लाखों लोक मेले तरी चालतील पण तिची मान उंचच राहिली पाहिजे, म्हणूनच तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्हीर अकबराला शरण जाऊ नका.” आणि दुसऱ्याच क्षणी चंपाने मान टाकली… कायमची! त्यानंतर महाराणाने आपला विचार बदलला आणि दृढनिश्याने कष्ट सोशीत राहिला.

 

Leave a Comment