लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा | Marathi Both Katha For Kids

|| लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा ||

लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा
लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा

गर्वाचे घर खाली

लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा
लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा

पांडवात भीम हा फारच बलवान होता. बकासुर व जरासंध यासारख्या बलवान राक्षसांना भीमाने यमसदनास पाठविले त्यामुळे आपण फारच बलवान आहोत, आपल्यासारखा दुसरा कोणीच बलवान नाही, असे भीम स्वतःला समजू लागला आणि त्याला आपल्या बळाचा फारच अभिमान वाटू लागला होता. ” एकदा पांडवांनी राजसूय यज्ञ केला. त्या याज्ञासाठी मोठमोठ्या ऋषींना बोलावणे पाठवावयाचे होते. ऋषींना बोला-विण्याचे काम भीमाला सांगण्यात आले. हे काम भीमाने आनंदाने आपल्याकडे घेतले व तो या कामगिरीसाठी निघाला.

ऋषींना बोलविण्याचे काम फार कठीण होते. कारण सारे ऋषी जंगलात राहात होते. शिवाय जंगलातून जाण्याची वाट अवघड होती. शिवाय जंगली प्राणी व राक्षस यांचा धोका होता. तरी भीम अशा अवघड कामगिरीसाठी निघाला.जाता जाता त्याला जंगलातून वाट लागली. वाटही फारच अरूंद होती. वाटेच्या दोन्ही बाजूना घनदाट झाडी होती. तरी भीम न घाबरता पुढे पुढे चालला होता. पण मध्येच मोठी अडचण आली व त्याला थांबणे भाग पडले. कारण एक म्हातारा वानर आपली लांबच लांब शेपटी रस्त्यावर आडवी- तिडवी पसरून झोपला होता. त्याच्या शेपटीने सारा रस्ताच अडवून टाकला होता.

वानराने रस्ता अडविलेला पाहून भीमाला त्या वानराचा फारच राग आला. तो वानराला दरडावून म्हणाला, “ए वानरा, ऊठ तुझी शेपटी बाजूला घेऊन रस्ता मोकळा कर नाही तर अलगद भिरकावून बाजूला.” भीमाचे हे शब्द ऐकताच तो उठून बसला आणि शांतपणे भीमाला म्हणाला, “काय रे बाबा, काय सांगतो आहेस?” वानराचे हे बोलणे ऐकून भीम अधिकच भडकला व तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “मूर्खा, तुला एवढेसुद्धा कळत नाही. रस्त्यावर आडवी शेपूट टाकून रस्ता अडवून काय बसलास आहे. चल तुझी शेपटी बाजूला घे आणि रस्ता मोकळा कर.

भीमाचे हे शब्द ऐकताच तो म्हातारा वानर शांतपणे म्हणाला, “अरे बाबा, म्हातारपणामुळे माझ्या अंगात त्राण राहिलेले नाही. तू बराच जाडजूड दिसतोस. तेव्हा तू माझी शेपटी जरा बाजूला कर.वानराचे हे बोलणे ऐकून भीम म्हणाला, “त्यात काय मोठेसे?” असे म्हणून भीमाने वानराच्या शेपटाला हात घातला, पण एका हाताने ती त्याला उचलेना, तेव्हा भीमाने दोन्ही हात लावले, पण शेपटी हालेना. भीमाने आणखी जोर लावला. पण काहीच उपयोग झाला नाही. वानराची शेपटी आपली जाग्यावरच.

शेवटी भीमाला शेपटी हलेना तेव्हा वानर शांतपणे म्हणाला, का रे, तू एवढा ताकदवान दिसतोस आणि माझे ऐवढेस शेपूट तुला उचलता येत नाही!”वानराचे हे शब्द ऐकून भीमाने एकदम लाजेने मान खाली घातली. त्याचा गर्वहरण झाला. तो वानर म्हणजे कोण हे भीमाने ओळखले. तो वानर ‘मारुती’ होता. मागून तो म्हणाला, “मारुतीराया, तुम्ही मला चांगला धडा शिकविला. माझा बळाचा अभिमान साफ नाहीसा झाला.” भीमाचे हे शब्द ऐकून मारुतीच्या पायावर डोके ठेवले आणि क्षमा मागून तो म्हणाला, “मारुतीराया, तुम्ही मला चांगला धडा शिकविला. माझा बळाचा अभिमान साफ नाहीसा झाला. ”

भीमाचे हे शब्द ऐकून मारुती म्हणाला, “भीमा, गर्व करू नकोस. दुबळे असतील त्यांना संकटातून सोडविण्यासाठी तू तुझ्या बळाचा उपयोग करीत जा. त्यातचं तुझे कल्याण आहे.” असे सांगून मारुतीने आपली शेपटी बाजूला घेतली.

गुरु भक्त आरूणी

लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा
लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा

भारतात असणाऱ्या महान गुरुकुलांपैकी एका गुरुकुलाचे कुलगुरु होते महर्षी धौम्य धौम्यांच्या आश्रमात शेकडो शिष्यांचा समुदाय शास्त्राध्ययन करीत होता. स्वतःच्या गरजा स्वतःच पूर्ण कराव्यात या न्यायाने कुलगुरुंनी सगळ्यांना शेतीचा आदेश दिलेला असायचा. सगळ्या गुरुकुलात विद्यार्थी प्रचंड मेहनत करीत. सुखार्थ्याला विद्या कुठली हा त्या काळाचा नियम होता.एके दिवशी आकाशात अचानक ढंग गोळा झाले. पावसाळ्याचे दिवस नसल्याने शेतीत पूर्वतयारी काहीच केलेली नव्हती. शेतीला पाणी मिळावे म्हणून एक बांध तयार केलेला होता पण सध्या थोडेच पाणी असल्याने त्याला मजबूत केलेले नव्हते. आता काय करावे? गुरुजींसमोर मोठाच प्रश्न होता. तेवढ्यात टपोऱ्या थेंबांनी पावसाला सुरुवात झाली.

गुरुजी धौम्य काळजीत पडले, पाऊस प्रचंड येणार, अशी चिन्हे दिसत होती आणि बांध तर कच्चा होता. बांध फुटणार हे नक्की. बांध फुटला तर उभे पीक नासवणार आणि शेवटी आश्रमात शिरून आश्रमाचा नायनाट करणार. करावे तरी काय?.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच एकेक शिष्य पळायला लागला. कोणाला आपल्या झोपडीची काळजी होती तर कोणाला वस्त्रांची. कोणी ग्रंथाचे नाव सांगितले तर कोणी पूजा साहित्याचे सगळेच पळाले. उरला फक्त एकटा आरुणी बालक, बालक आरुणी आचार्यांना म्हणाला, भगवन! आपण चिंता करू नका.

मी पाहतो बांधाचे काय करायचे ते आरुणी शेतावर गेला पाहतो तो काय एका जागी बांध फुटून पाणी शेतात पसरू लागले होते. पाणी तर वाढतच होते. इतर जागी बांध व्यवस्थित होता पणं तिथेच फुटला होता.आरुणीने तिथे माती लावायला सुरुवात केली पण पाण्याच्या ओघात ती जागेवर राहणार कशी? दुसरा गोळा करेपर्यंत पहिला वाहून जायचा. आता करावे तरी काय आणि शेवटी आरुणीने एक महान निर्णय घेतला तो स्वत”च्या शरीराचा बांध करून त्या जागी झोपला, पाऊस थांबला. पण आता उठले तर पाणी आतघुसणारच. आरुणी रात्रभर तसाच पडून राहिला. त्या भयानक थंडीत त्याचे अंग अक्षरशः लाकडाप्रमाणे कडक झाले. पण गुरूसेवा ही त्याच्यासाठी प्राणापेक्षाही श्रेष्ठ होती.

सकाळी आरुणी दिसेना तेव्हा सगळे शेताकडे धावले. सगळ्यांनी अद्भुत गुरुभक्ती पाहिली. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. गुरुजींनी आरुणीला उचलून छातीशी धरले. बाकी विद्यार्थ्यांनी बांध चटकन दुरुस्त केला. आरुणीने स्वतः प्राण धोक्यात घालून शेत व आश्रमातील सगळ्याचे प्राण दोन्ही वाचविले होते. गुरुभक्तांच्या यादीत बालक आरुणीचे नाव फार वरच्या स्थानी आरूढ झाले.

दृढ श्रद्धेचे फळ

लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा
लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा

एका धनिकाकडे एक गुलाम होता. त्या गुलामाचे दुर्दैवात सुदैव एवढेच की, त्याचा धनी दयाळू होता. तो स्वतः जो उत्तम अन्न खाई, तसेच अन्न त्या गुलामालाही पोटभर देई. एकदा धन्याने बाजारातून चार काकड्या आणल्या त्यांतील काकड्या त्याने त्या दोन गुलामाला दिल्या गुलामाने त्या दोन्ही काकड्या खाऊन संपविल्या. थोड्या वेळाने त्या धन्याने त्याच्यापाशी असलेल्या दोन काकड्यांतील एक काकडी खाण्यासाठी चावली, तर ती त्याला एकदम कडू लागली. त्यामुळे त्याने त्या गुलामाला विचारले, “काय रे, काकड्या एकदम कडू असताना तू त्या खाऊन कशा काय संपविल्यास?”

गुलाम म्हणाला, “धनी, आजवर तुम्ही मला जी जी वस्तू खायला दिलीत, ती चांगलीच दिलीत. त्यामुळे तुम्ही दिलेल्या काकड्या जरी कडू होत्या. तरी त्या प्रकृतीला बऱ्या असाव्यात म्हणूनच तुम्ही त्या मला खायला दिल्या असणार, अशा दृढ श्रद्धेमुळे व तुमच्या स्वभावातील गोडत्यामुळे त्या काळड्यांचा कडूपणा फिका पडला व मी त्या काकड्या सहज संपविल्या. त्या गुलामाचीआपल्यावरील दृढ श्रद्धा पाहून त्याच्या धन्याचे हृदय आनंदाने भरून गेले व त्याने त्याला गुलामगिरीतून मुक्त केले.

 

Leave a Comment