Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा तात्पर्य

Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा तात्पर्य

Marathi Bodh Katha,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi
Marathi Bodh Katha

प्रामाणिक लाकुडतोड्या

Marathi Bodh Katha,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi
Marathi Bodh Katha

एका गावामध्ये एक लाकूडतोड्या राहत होता. लाकूडतोडून आपला संसार चालत होता. एके दिवशी तो झाड शोधत एका नदीकाठी गेला त्याला एक मोठे झाड सापडले तो त्या झाडावर फांदी तोडण्यासाठी चढला आणि फांदी तोडू लागला.अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली नदीत पडली.त्याच्याजवळ दुसरी कुराड घेणे इतपत ही पैसे नव्हते तो खूप निरास झाला आणि नदीकाठी येऊन रडू नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकून प्रकट झाली आणि त्याला विचारू लागली की का रे तू रडत आहेस. लाकूडतोड्या सरिता देवीला आपली कुऱ्हाड नदीत पडली असे सांगतो.

सरिता देवी लगेच नदीत बुडी घेऊन हातात सोन्याची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते आणि लाकूडतोड्याला विचारते ही आहे का तुझी कुऱ्हाड. लाकूडतोड्या नम्रपणे म्हणतो देवी ही माझी कुऱ्हाड नाही मग देवी त्याला चांदीची खुराक दाखवणे तो परत मान हलवून ही देखील नाही कुऱ्हाड माझी देवीला सांग.

आता देवी पुन्हा बुडी घेऊन नदीत जाते व लोखंडाची खुराक घेऊन प्रकट होते इतक्यात लाकूडतोड्या म्हणतो होय हीच माझी कुऱ्हाड आहे देवी.
देवी म्हणते तू खूप प्रामाणिक आहे या प्रामाणिकपणामुळे या तीनही कुऱ्हाडी तुलाच बक्षीस स्वरूपात ठेव.

तात्पर्य:- नेहमी खरे बोलावे.

कष्‍टाची कमाई श्रेष्‍ठ

Marathi Bodh Katha,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi
Marathi Bodh Katha

एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्‍यांना एक साधू संत मादिरामध्ये झोपलेले दिसले. त्‍यांनी संताला उठवले व म्हणाले कि काही असेल तर द्या नाही तर मारून टाकले जाऊ.

संताने त्यांना विचारला तर त्या चोरांनी सांगितले कि आम्ही चोर आहोत.आम्ही चोरी करतो .हे ऐकून संत म्‍हनाले, तुम्‍ही करता ते चांगलेआहे की वाईट याचा कधी विचार केला ?
चोर म्‍हणाले,” आम्‍ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्‍ही तीन हिस्‍से मध्ये वाटतो. एक एक भाग आम्‍ही घेतो आणि तिसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो.

हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले ”आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हीला हा कोंबडादेऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही.पण आता चोरापुढे प्रश्न पडला कि आता याचे हिस्‍से कसे करायचे. ते दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले.

संताने त्यांना आशय समजावून म्हाणाले कि चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्‍टाची कमाई करून त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवा. ते खरे सार्थक आहे .हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्‍कार करून
चोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले.

तात्‍पर्य :- पापाची कमाई दु:खाचे कारण बनते तर कष्‍टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्‍म्‍याला सुख देते.

आई वडिलाचे संस्कार

Katha,आई वडिलाचे संस्कार,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi
Marathi Bodh Katha

एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता. त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते.तो त्या संस्‍कारांना धरून वागत होता .तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कमा निमित गेला. घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता. नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्या साठी गेला . मुलगा तेथेच बसून राहिला. त्याच्या समोर एका टोपलीत सफरचंद ठेवलेले होते.त्याला सफरचंद खूप आवडायचे परंतु त्याने त्याला हात न लावता तो शेजाऱ्यांची वाट पाहात बसला होता .ब-याच वेळाने शेजारी घरी परत आला त्‍याने पाहिले की मुलगा वाट बघत बसला आहे व त्‍याच्‍या शेजारी सफरचंदे असताणही तो त्‍यांना खात नाही.त्‍या मुलालाही सफरचंद आवडत हे त्यांना माहीत होते तरी त्‍याने त्‍यांना हात लावला नाही.

शेजारी आले की त्याने त्यांना नमस्कार केला .शेजाऱ्यांनी त्याला विचारले,”तुला सफरचंद आवडतात ना, मग तरी तू एक ही सफरचंद का खाल्‍ले नाहीस” मुलगा म्‍हणाला,” इथेच कोणीच नव्‍हते, मी एक दोन सफरचंदे जरी खाले असती तरी कुणालाच काही कळले नसते,मला कोणीच पाहत नव्‍हते पण मी स्‍वत:ला पाहात होतो.म्हणून मी खले नाही मी स्‍वत:ला फसवू शकत नाही.शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला.तो म्‍हणाला,”आपला आत्‍मा आपण काय करतो ते पाहात असतो, आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला फसवू पण आपण आल्याला खोटे बोलयाचे फार अवघड आहे.

तात्‍पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे बोलणे अडवल्यास मुले भविष्‍यात योग्‍य दिशेने वाटचाल करतात . मुले वाईट वर्तनाची निघाल्‍यास त्‍याचा दोष आईवडीलांच्या संस्कारचा दोष येतो.

हुशार शेतकरी

हुशार शेतकरी ,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi
हुशार शेतकरी

एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता. त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होती. शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई. वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत कारण वाघाला शेळी खाईल याची त्याला भीती वाटते. एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो. मध्ये गेल्यावरती तो शेळी साठी एक गवताची पेंडी तयार करतो. व खूप पाऊस चालू होतो. त्याला घरी येता वेळेस नदी पार करून यावे लागत.

नदीला खूप पूर आला होता. शेतकरी शेळी वाघ व गवताची पिंडी घेऊन नदीकिनारी येतो. काही सुचत नाही की आता नदी कशी पार करावी.काय करावे असे तो विचारात पडतो तो मदत होईल का ते पाहू लागतो.
किनारी त्याला एक नाव दिसते तो त्या नावे जवळ जातो. एका वेळेस दोन जणांना घेऊन जाईल या अवस्थेत होती. शेतकऱ्यापुढे प्रश्न पडला की आपण यांना नदीकिनारी कसे घेऊन जावे. शेतकरी विचार करतो की आपण जर पहिल्यांदा गवताची पेंडी घेऊन गेलो तर वाघ शेळीला खाऊन टाकेल व वाघाला घेऊन गेलो शेळी गवत खाऊन टाकेल.

तू विचार करतो आणि नावे मध्ये शेळीला घेऊन दुसऱ्या टोकाला सोडून येतो. वाघाला घेतो आणि दुसऱ्या टोकावर ती सोडून येतो आता तो आधी आपल्यासोबत परत या टोकावर घेऊन येतो व गवताला घेऊन जातो
परत तो वापस येतो व शेळीला घेऊन जातो. अशी करून तो नदी सुखरूप पार करतो.

तात्पर्य : विचार करून काम केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही

गरुड आणि घुबड

एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिकांची पिल्ले खायचे नाहीत. यावर घुबड गरुडास मिळाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का . तुला माझी पिल्ले माहित नसतील तर तू दुसऱ्या पक्षाचे म्हणून माझीच पिल्ले खाशील. अशी मला भीती वाटते. गरुड म्हणाले खरंच यार तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहीतच नाही. यावर घुबड म्हणाले माझे पिल्ले खूप सुंदर दिसतात त्यांचे डोळे व पिसे सुंदर दिसतात त्यांचे सगळं काही सुंदर असतात. या वर्णनावरून माझे पिल्ले तुला सहज ओळखू येतील.

पुढे एक दिवस गरुड तरी चा शोधत निघतो. एका झाडाच्या ढोलीमध्ये पक्षाचे पिल्ले दिसतात. विचार करतो की हे घुबडाचे तर पिल्ले नसतील. पिल्ले घाणेरडी कंटाळवाणी आणि कुरूप होती. यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला घुबडाने सांगितले होते की माझी पिल्ले सुंदर आहेत. त्यावरून त्याला ही घुबडाची पिल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटते. तू त्या पक्षांना फत्ते करतो.
घुबड त्या ढोली जवळ येतात त्याला आपली पिले नाहीशी झालेले पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझी पिल्ले मारून खाल्लीस असे मला वाटते.

यावर गरुड म्हणाला मी पिल्लू खाल्ली तर आहेत पण तुझी नाही. यावर घुबड म्हणाले ते माझीच पिल्ले होती. म्हणाले यावर माझा काही दोष नाही तू आपल्या पिल्लाचे खोटे वर्णन केलेस त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील एखाद्या दुसऱ्या पक्षाचे असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले यात माझा काही अपराध नाही.

तात्पर्य-स्वतः संबंधी खरी हकीकत लपवून ठेवणे भलतीच हकीकत सांगणाऱ्या मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.

Marathi Bodh Katha आवडतील. आम्हाला विश्वास आहे की, आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल आणि आम्हाला तुमचा पाठिंबा लाभेल आपल्या घरातल्या लहान मुलांना या गोष्टींचाआनंद द्या आणि . तुम्ही स्वतः घ्या सर्व मराठी बांधवांपर्यंत शोधमराठी हे संकेतस्थळ पोहोचवा……

हा Marathi Bodh Katha लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद….

4 thoughts on “Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा तात्पर्य”

Leave a Comment