Best Marathi Katha | Mrutyu | मृत्यू मराठी कथा

Mrutyu | Marathi katha | मृत्यू | मराठी कथा 

मराठी कथा ,शोधमराठी ,shodh marathi, marathi katha ,Mrutyu | मृत्यू
Mrutyu | मृत्यू

आपण आज  Mrutyu | मृत्यू मराठी कथा (Marathi Katha) यातून माणसाला मरण का हवेच ? हे पाहणार आहोत…

एक राजाला अमर होयाचे होते. त्याला मृत्यू नको होता. तो अपलेला अमर करण्या साठी साधू महाराज शोधू लागला होता. पूर्ण राज्यमध्ये प्रसिद्ध साधू महाराज भेटला नाही कि जो त्याला अमर करेन .मह्राजाला एक शिपाई सांगतो महाराज आपल्या राज्याच्या बाहेर एका वन मध्ये एक साधू महाराज ध्यान करत आहेत.तेच तुम्हाला उपाय सांगतील.  राजा लगेच साधू महाराजकडे गेला व त्याने विचारले कि , ” साधू महाराज, मला अमर होयाचे आहे.मला या साठी काही उपाय सांगा.

यावर साधू महाराज म्हणाले समोर दिसत असलेल्या पर्वता पलीकडील तुला एक सरोवर दिसेल.त्याचे पाणी तू पी म्हणजे तू अमर होशील.” ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोसरापाशी गेला. तो त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या दोन हातांची ओंजळ करून वाकला न वाकला, तोच त्याच्या कान कुणी तरी कण्हत असल्याचा आवाज पडला. पाणी पिणे बाजूला ठेवून तो त्या आवाजाच्या रोखाने गेला, तर एक जराजर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याला त्याच्या कण्हण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला, “या सरोवराचं पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आलं खरं ; पण वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हाकलून दिले.

गेली पन्नास वर्ष मी येथे तळमळत पडलो आहे  पूर्ण दुर्लक्षित असलेल्या अवस्थेत. आता माझी मुलं तर मेलीच; पण नातवंडंही मरायला झाली आहेत. हे बघायला लागू नये : म्हणून गेली पाच वर्ष मी अन्नत्याग केला आहे. तरीही मी मरत नाही. ‘ “त्या वृद्धाची माणसाची कहाणी ऐकल्यावर राजा स्वत: मनात म्हणाला, ‘छे! नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणा शिवाय जर अमर झाले , तरच जीवनात मजा आहे. आपण त्याबद्दलचा उपाय तर साधूला विचारला पाहिजे.’ मनात असे ठरवून, राजा पुन्हा त्या साधूकडे गेला आणि वृद्धत्वाशिवाय अमर होण्याचा त्याने त्याला उपाय विचारला. साधू म्हणाला, “ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्यापुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास, पिवळ्याजर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल, त्या वृक्षाचे एक फळ तू तोडून खा; म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व प्राप्त होईल.”

त्या साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला..

त्याने एक पिवळेधमक फळही काढले. आता तो ते खायला सुरुवात करणार तोच एकाएकी जवळपास कडाडून भांडण सुरू झाल्याचे त्याच्या कानी आले. तिकड़े जाऊन, तिथे भांडत असलेल्या चार तरुणांपैकी एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले असता तो म्हणाला, आता मी अडीचशे वर्षांचा झालो, तरी हा माझ्या उजव्या बाजूला उभा असलेला तीनशे वर्षांचा बाप आमची पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करीत नाही. मग त्याच्याशी भांडू नको, तर काय करू?”

राजाने त्या तरुणाच्या इतक्याच तरुण दिसणाऱ्या त्याच्या तगड्या बापाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता तो म्हणाला, “अहो, मी काय करू? हा माझ्या उजव्या बाजूला ताठ उभा राहिलेला माझा साडेतीनशे वर्षीचा माझा बाप जर ती मालमत्ता माझ्या स्वाधीन करील, तरच मी ती माझ्या मुलाला देऊ शकेन ना?” यावर तो बापाचा बाप म्हणाला, “यात माझा खरोखरच काही दोष नाही. माझ्या उजव्या बाजूला छाती पुढे करून उभा राहिलेला माझा चारशे वर्षांचा बाप जर ती मालमत्ता माझ्याकडे सुपूर्त करायला तयार नाही, तर ती मालमत्ता मला माझ्या मुलाला कशी देता येणार? त्याने जवळच असलेल्या अजरामर नावाच्या वृक्षाचे फळ स्वतः खाल्ले आणि आपल्या मुलाला, नातवाला व पणतूला मोठ्या कौतुकाने खायला दिले; त्यामुळे आमच्या वाट्याला हे वाईट दिवस आले.’ राजाने त्यांच्यातील तरुण

पणजोबाला विचारले, “तुमचे घरदार असताना तुम्ही इकडे कशाला आलात ?”पणजोबा म्हणाला, “अहो, मालमत्तेसाठी अष्टौप्रहर आमच्यात कडाडून भांडणे होऊ लागल्याने, गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर कायमचे पिटाळून लावले.

तो प्रकार पाहून राजा मनात म्हणाला, ‘म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळालं, तरी ते भयंकर आहे म्हणायचं !’ मनात असा विचार करून राजा परत त्या साधूकडे गेला व त्याला म्हणाला, “महाराज, माणसाला मरण हे हवेच. ते आहे; म्हणून जगात प्रेम आहे. ते नसेल, तर माणूस माणसाला खायला उठेल.

 तात्पर्य:- माणसाला मरण हवेच !

तुमहाला आजची हि  Mrutyu | मृत्यू मराठी कथा (Marathi Katha) आवड असेल . आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्की तुमची साथ मिळेल . आपल्या घरातल्या लहान मुलांना या गोष्टींचा पूर्ण आनंद द्या आणि  तुम्ही स्वतः घ्या.

हा Mrutyu | मृत्यू मराठी कथा (Marathi Katha) लेख तुम्हाला कसा वाटला ते  कंमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशीच नवीन गोष्टी किंवा माहिती चा आनंद घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.

WhatsApp ग्रुप मध्ये सामील होण्यासठी लिन्क वर क्लिक करा. :- Jion WhatsApp Group

धन्यवाद….

Leave a Comment