Abha Card Benefits |आभा कार्ड चे फायदे
आभा कार्ड : सामान्य माणूस आता आभा कार्ड म्हणजेच डिजिटल हेल्थ कार्डचा लाभ घेऊ शकणार आहे. खरं तर, केंद्र सरकारने आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत डिजिटल हेल्थ कार्ड 2022 लाँच केले आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) National Health Authority ट्विटरवर यासंबंधीची माहिती दिली आहे.ट्विटरवरील माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आभा कार्ड
आभा कार्ड म्हणजे डिजिटल हेल्थ कार्ड होय. बरेचदा असे दिसून येते की लोक जुने वैद्यकीय अहवाल किंवा उपचारांशी संबंधित कागदपत्रे गमावतात. किंवा घरातून बाहेर पडताना आरोग्याशी संबंधित जुन्या नोंदी घेणे विसरतात. अशा परिस्थितीत त्याचा संपूर्ण अहवाल आणि वैद्यकीय इतिहास आभा कार्ड मध्ये डिजिटल पद्धतीने सेव्ह केला जाते, जे कि गरजेच्या वेळी उपयोगी पडेल. आभा कार्ड हे एक प्रकारचे ओळखपत्र आहे, जे तुमच्या डिजिटल ओळखपत्रासारखे आहे. यामध्ये तुमचे वैद्यकीय रेकॉर्ड सुरक्षित राहतील. तुमचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास आभा कार्ड मध्ये एकाच ठिकाणी डिजिटल पद्धतीने सेव्ह केला जातो.आभा कार्ड बनवल्यावर 14 अंकी आयडी क्रमांक मिळतो. तुमची वैद्यकीय माहिती त्या आयडी क्रमांक वरून वाचता येते.कोणताही भारतीय नागरिक आभा कार्ड बनवू शकतो.
आभा कार्ड चे फायदे
आभा कार्डद्वारे वैद्यकीय माहितीचे डिजिटल स्टोरेज व आरोग्य सेवा व्यक्तींसाठी अधिक सुलभ, सोयीस्कर आणि कार्यक्षम बनवते. हे कार्ड सरकारी आणि खासगी दोन्ही रुग्णालयांमध्ये चालते. एवढेच नाही तर कोणत्याही डॉक्टरांच्या खासगी दवाखान्यातही याचा वापर करता येऊ शकतो. आभा कार्ड ( हेल्थ आयडी )चे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
- उपचारासाठी आरोग्याशीसंबंधित कागदपत्रे किंवा स्लिप सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही.
- यामध्ये तुमचा आजार किंवा त्रास काय आहे ,रक्तगट तसेच औषधी आणि डॉक्टर यांच्याशी संबंधित सर्व माहिती असेल.
- तुम्ही तुमची सर्व वैद्यकीय नोंदी जसे की लॅब रिपोर्ट, प्रिस्क्रिप्शन आणि निदान दाखवू शकता.
- ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसिन, खासगी डॉक्टर, ई-फार्मसी आणि वैयक्तिक आरोग्य नोंदी यासारख्या सुविधा उपलब्ध असतील,
- या कार्डला विमा कंपन्यांशी लिंक करण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्हाला विम्याचा लाभ मिळेल.
- रुग्णालये, दवाखाने आणि विमा कंपन्यांसह वैद्यकीय नोंदी सहज शेअर करता येतील.
ABHA कार्ड कसे बनवले जाईल ?
• आयुष्मान डिजिटल हेल्थ मिशनची वेबसाइट उघडा.त्यासाठी येथे क्लिक करा.
• होम पेजवर Create Your ABHA Number यावरती क्लिक करा.
• ABHA क्रमांक तयार करण्यासाठी दोन भिन्न प्रकारचे पर्याय दिसतील, तुम्हाला सोपा वाटणारा एक निवडा.
• आधार क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक करा आणि पुढील पृष्ठावर क्रमांक प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
• तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP दिसेल. हे प्रविष्ट करून, तुम्ही ABHA कार्डचा अर्ज भरता.
• अर्जात विचारलेली माहिती दिल्यानंतर ती सबमिट करा. यानंतर तुमचा फोटो अपलोड करा.
• यासाठी तुम्हाला My Account वर क्लिक करावे लागेल.
• नंतर दिलेल्या पर्यायातून प्रोफाइल संपादित करा वर क्लिक करून तुमचा फोटो अपलोड करा.
• वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सबमिट बटणावर क्लिक करा.
• ABHA कार्ड तयार केले जाईल.
• ABHA कार्ड डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
आभा कार्ड साठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- शिधापत्रिका
- रहिवाशी प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर
आभा कार्ड तुमच्या आरोग्य सेवेसाठी खूप लाभ दायक आहे. आभा कार्डचे फायदे आपण पाहीले आहेत. आरोग्य सेवेचा लाभ घेताना तुमची सर्व वैद्यकीय माहिती उपचारांशी संबंधित कागदपत्रे एकाच ठिकाणी करा . पेपरलेस प्रणाली आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांपर्यंत पोहोचल्यामुळे, आभा कार्ड हे भारतातील आरोग्यसेवेचे भविष्य ठरू शकते. त्यामुळे आजच तुमचे आभा कार्ड काढा. आणि तुमची सर्व वैद्यकीय माहिती एकाच फोल्डरमध्ये साठवून ठेवा.
शोधमराठी वरील Abha Card Benefits |आभा कार्ड चे फायदे ही माहिती कशी वाटली हे तुम्ही नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.. आशी अधिक माहिती पाहण्यासाठी व ती माहिती वाचत राहण्यासाठी सर्व मराठी बांधवांनी आमच्या शोधमराठी या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आजच सामील व्हा……
आमच्या या ब्लॉग ला पण एकदा भेट द्या KISANHELPINFO.COM
धन्यवाद…….