Bal Sanskar Katha | बालसंस्कार कथा
मैत्री ( katha )
एका गावात दोन व्यापारी राहत होते एकाचे नाव माधव आणि दुसऱ्याचे नाव राघव असे होते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. दोघे खूप श्रीमंत होते. काही दिवसानंतर माधवला व्यापारात अपयश आल्याने कर्जात डुबू लागला आणि गरीब होतो. राघव कडमध्ये साठी धावून जातो. राघव खूप दयाळू मनाचा असल्याने त्याला आपल्या संपत्तीतील अर्धी संपत्ती देऊन टाकतो.
राघव च्या मदतीने माधव खूप आनंदी होतो व माधवला वचन देतो की कधी तुला मदत लागेल तर मी आवश्यक मदत करीन. असेच बरेच वर्षे जातात व राघव गरीब बनतो आता त्याला माधव ची आठवण होते. त्याला मदत करीन या अपेक्षेने तो त्याच्याकडे जातो पण माधव त्याची मदत करत नाही त्याला हकलवून देतो.रागवला खूप वाईट वाटते कारण माधवने त्याच्यासोबत केले ते खूप वाईट कृत्य होते.
रागवत असलेले हे कृत्य राघवच्या एका नोकरांनी पाहिले आणि तो राजाकडे जाऊन हे सगळे सांगतो. हे सगळे ऐकून राजा त्या दोघांना दरबारामध्ये बोलून घेतो.राजा माधवला त्याची जुनी आठवण जागी करून देतो आणि माधवला आदेश देतो की तुझी अर्धि संपत्ती द्यायला सांगतो. रागवला अर्धी संपत्ती देतात त्याला योग्य तो न्याय मिळाला
तात्पर्य :- न्याय कधीही खरा करावा.
हुशार मुलगा ( katha )
एक गावात एक चोर राहत होता. आपण चोर आहोत याचा खूप गर्व होता. त्याला वाटायचे की मी खूप हुशार आहे मला कोणीच हसू शकत नाही. आणि मला चोरी करण्यात कोणीच हरवू शकत नाही. मी कोणालाही मूर्ख बनवू शकतो. आत्तापर्यंत तो जिथे ही चोरी करायला गेला आहे तिथून परत मोकळ्या हाताने आला नाही.
एके दिवशी चोरी करण्यासाठी बाहेर निघlला होता.गावामध्ये जाताच त्याला एका विहिरीजवळ एक मुलगा दिसतो.तो मुलगा रडत होता. चोराने त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारले की तू का रडत आहेस तर मुलाने यावर उत्तर दिले की या विहिर माझी चांदीची बकेट पडली आहे.चोराने विचार केला की मी याची बकेट काढून दिली नंतर मी चोरून घेऊन जाईन. आणि तू चोर ती बकेट शोधू लागतो.
त्याने कपडे काढले आणि विहिरीत उडी मारली त्यांनी शोधली पण त्याला काही मिळाली नाही जेव्हा तुम्ही बाहेर आला आणि पाहिले की मुलगा सगळे कपडे घेऊन गायब झाला. त्या मुलाने चोराला मूर्ख बनवले व चोर स्वतः फसला होता.
तात्पर्य:-गर्वाचे घर खाली.
लालची कुत्रा ( katha )
एका गावात एक दुकानदार मटणाचा व्यवसाय करत होता . दुकानात खूप लोक काम करत आणि त्याच्या दुकानासमोर काही कुत्री नेहमी बसलेली असेल. दुकानात खराब झालेली मटन किंवा खाली पडलेले तुकडे ते त्या कुत्र्यांना टाकत.
एके दिवशी एका कुत्र्याला खूप भूक लागते व तो त्या दुकानातून काही मटणाचे तुकडे घेऊन तेथून धूम ठोकतो.तुकडा खाण्यासाठी चांगली जागा शोधत असतो आणि तो नदीपलीकडे जाण्याचे ठरवतो. असताना तो कुत्रा पाण्यात डोकावून पाहतो तर त्याला त्याचेच प्रतिबिंब दिसते व त्याला तो दुसरा कुत्रा आहे असे समजतो.
त्याच्या मनामध्ये लालच येते.आपण याला हरवून तो मटणाचा तुकडा घ्यावा व तो त्या कुत्र्याला भुंकू लागतो. त्याच्या तोंडातील तुकडा पाण्यात पडतो व नदीमध्ये वाहू लागतो.
तात्पर्य:-जेवढे मिळाले तेवढेच समाधान मानव जास्त गोष्टीचा हव्यास करू नये.
चुकीचा सल्ला ( katha )
एकदा एक माणूस व्यापारासाठी आपला घोडा घेऊन निघाला. पुढे जात असताना त्याला एक नदी लागते. त्याला नदी पार करून पलीकडे जायचे होते पण त्याला ती नदी किती खोल आहे हे काहीच माहिती नव्हते. तो मध्ये ती साठी आजूबाजूला पाहतो व तिथे त्याला एक लहान मुलगा दिसतो. तू व्यापारी त्या लहान मुलाला विचारतो की ही नदी किती खोल आहे.यावर मुलगा घोड्याकडे पाहतो व विश्वासाने म्हणतो की तुमचा घोडा नदी सहज पार करेन.
मुलाचा सल्ला ऐकून व्यापारी नदी पार करण्यासाठी सुरुवात करतो परंतु नदीच्या माध्यमातून पोहोचल्यावर त्याच्या लक्षात येते की आपण खूप खोल वर चाललो आहेत. आपला घोडा बुडालाच आहे. कसा बसा तरी घोडा आपला परत किनाऱ्यावर आणतो .व्यापारी किनाऱ्यावर येतात त्या मुलाला खूप रागवतो. जोरात विचारतो की तू मला खोटे का बोललास.
यावर लहान मुलगा घाबरत उत्तर देतो की पण माझी बदके तर खूप लहान आहेत आणि दररोज ही नदी ते सहज पार करतात. त्यांचे पाय घोड्यापेक्षा खूप लहान आहेत. पाय खूप मोठी आहेत या अंदाजाने मी घोडा नदी सहज पार करेल असे सांगितले.
तात्पर्य – उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी तू खरोखर काय माहिती देतोय ते जाणून घ्या.
आणखी लहान मुलांच्या गोष्टी वाचण्यासाठी येथे किल्क करा …,
तुम्हाला Bal Sanskar Katha | बालसंस्कार कथा कश्या वाटल्या ते नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा. शोधमराठी या संकेतस्थळला आपला प्रतिसाद द्या.
सर्व मराठी बांधवांचे शोधमराठी या यूट्यूब चैनल वर स्वागत आहे…………धन्यवाद….
1 thought on “Bal Sanskar Katha | बालसंस्कार कथा लहान मुलांच्या गोष्टी”