|| साद आत्मविश्वास जागृतीची ||
मी काय करायला हवे मी कसे जगले पाहिजे ? याविषयीचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य जेव्हा आपण गमावून बसतो, तेव्हा आपल्याला ऑस्कर वाइल्ड आठवतो. आयुष्यात जे हवे आहे, ते जसे आहे तसे कुणालाही मिळत नाही. पण, प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्न केल्यास, आश्चर्यकारक गोष्टी घडू शकतात.जगणे हे जगातील सर्वात दुर्मिळ बाब आहे. अनेक जण केवळ शरीरानेच या पृथ्वीतलावर असतात’ ब्रम्हांडाने प्रत्येकालाच निर्णय घेण्यासाठी बुध्दी दिली आहे. परंतु जेव्हा मनुष्य तिचाच अनादर आणि विपर्यास करतो तेव्हा मनुष्य मुळातच भित्रा आणि स्वार्थी असतो म्हणूनच त्याला ‘डर के आगे जीत है..’ या वाक्याची पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागते.
तरूणांनो ही चर्चा तुमच्याशीच का ? कारण तुमच्यात ते सर्व करण्याची ताकद आहे. तुमची स्वप्न कुणी ही पुर्ण करू शकणार नाही कारण तुमचं आयुष्य दुसरं कोणीही जगू शकणार नाही. तुम्हाला मिळालेला वेळ तुमचाच आहे. तुम्हाला मिळालेलं सुख दुःख तुमचीच आहे, म्हणून तुमची स्वप्न ही तुमचीच आहे.स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा. म्हणजे तुम्हाला दोष दयायला वेळच मिळणार नाही. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पहावे म्हणून नव्हे तर, त्या शिखराकडून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
हे खरं आहे की, आपणचं आपली विचारांची चौकट ठरवतो. आपणच तीच्या सीमा ठरवतो, आणि आपणच स्वतःला त्यात बंदिस्त करून ठेवतो. साहजिकच हा तुरूंग एवढा अभेदय असतो की दुसऱ्याचा चौकटी बाहेरचा सल्लासुध्दा हृदयापर्यंत पोहचणार नाही याची आपण काळजी घेतो. म्हणजे खरं तर विचारच होणार नसेल तर कृती कशी घडणार.आडदांड हत्तीला साधा तागाचा दोर बांधून ठेवतो. हत्ती लहान असतानाही तोच दोरखंड होता. त्यावेळी तो प्रयत्न करूनही तोडता आला नाही. तेव्हा विफल झालेले ते प्रयत्न तो अजूनही विसरला नाही.
मोठा झाल्यावर साध्या झटक्याने तुटणारा तो दोरखंड अजस्त्र हत्तीला बांधून ठेवतो कारण तो दोरखंड तोडताच येत नाही, अशी या हत्तीची बनलेली मानसिकता लहान एवढीशी मानसिकता त्याला गुलामीचे जीवन जगायला भाग पडते, त्यांच स्वातंत्र्य हिरावून घेते. किती गोष्ट ही, फक्त मानसिकता बदलण्याची. परंतु आपण प्रयत्न करून फायदाच नाही, प्रयत्न केला तरी अयशस्वी होवू, म्हणून दोरखंड बांधला रे बांधला की चुपचाप उभ राहायचं… ही अपयशाची भावना कधीची, तर आपल्या लहाणपणीची.. बसं असंच तरूणांच्या बाबतीत… घडत असत आपली नकारात्मक विचारांची चौकट तोडायला हिंमत लागते, त्याचे कारण अपयशी होण्याची भीती हेचं असतं.
आपण जरी वयानं मोठ होत असलो तरी विचारांना साचलेल्या पाण्यासारखचं ठेवतो. परिणामी ते पाणी गढूळ बनतं. त्यात ते आकर्षित करणार खळाळणं नसतचं. तसंच आपल्या जीवनात होवून जात. आपल्याकडे कोणतेही नवीन विचार नसतात. असतो तो स्वतःबद्दलचा कोमजलेपणा. आत्मविश्वास गमावलेली ते मुर्दाड शरीर. अतीव शांत असलेल ते मन. स्वतःलाच काय करायच. हे माहित नसलेल ध्येय. ध्येय कसल ते, दुसऱ्यांन ठरवायचं आणि आपण त्याच्या तालावर नाचायचं स्वतःच अस्तित्वच कोठे असतं तिथे. एवढे नकारात्मक परिणाम कशामुळे तर फक्त नाविण्यापूर्ण विचार न स्विकारल्यामुळे स्वतःच स्वतःवर दाखविलेल्या अविश्वासामुळे, विचारांची चौकटीत तोडल्यामुळे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही किती सुंदर आहात म्हणून ! काय नाही तुमच्याकडे एकदा स्वतःकडे जरा आत्मविश्वासाने निरखून पहा.
किती सौंदर्य लपलय तुमच्यात तारूण्याच्या सळसळऱ्या झऱ्याला उगाच थोपवून धरलय असे वाटेल तुम्हाला हेच उमेदीच वय कालपर्यत काय चुका झाल्यात, किती चुका झाल्यात हे विसरून भविष्याच्या प्रकाशात न्हाऊन निघण्याच वय, उगाच याला तारूण्य म्हंटले जात नाही. तारूण्य म्हणजे नवीनता, तारूण्य म्हणजे अभेदय आत्मविश्वासाचा गड, तारूण्य म्हणजे चंचलता, तारूण्य म्हणजे अपेक्षाकडे झेपावणारा, तारूण्य म्हणजे सदोदित प्रयत्नशील राहणारा, तारूण्य म्हणजे अपयशही आनंदाने पचवणारा, तारूण्य म्हणजे उत्साहाचा महासागर आपण खरोखरच तरूण आहात का ? मग तरूण कोणाला म्हणायचं ! शरीरानं तरूण म्हणजे तारुण्य नव्हे, तुम्ही विचाराने तरुण असायला हवेत. आत्मविश्वास हरवलेलं तारूण्य काय कामाच. जिंकण्याची ऊर्मी असलेला तरूण कुटूंबाला, समाजाला, देशाला हवाय.
अरे पण ! हे तुम्हाला मी का सांगतेय, कारण तुमच्यात हे सर्वच आहे. बस, विचारांची तेवढी चौकट तोडायची की झाले.
आपल्यामधील एक गोष्ट म्हणजे ‘स्व’ चा शोध न घेता येणे व कळपात मिसळून प्रवास करणे हा होय असे मला वाटते. पण मित्रांनो डोळे असून चालत नाही, खरे ते बघता आलं पाहिजे कान असून भागत नाही तर प्रचंड माहितीच्या, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खर उपयुक्त ऐकता आलं पाहिजे. आपल्याकडे डोकं असून काम भागत नाही तर या युगामध्ये आपल्या कुवतीला, आपल्यातील हन्नराला ओळखता आलं पाहिजे आमच्या सर्वांकडे हात-पाय आहेत, त्याचा योग्य मार्गाने उपयोग करता आला पाहिजे. या सर्व बाबी माझ्यात तुमच्यात किती ठासून भरल्या आहेत हे तपासण्याकरिता कुठेही कोणत्याही डॉक्टरकडे, कोणत्याही भविष्यकाराकडे, व्यावसायिकाकडे साधूकडे, मंदिराकडे जाण्याची गरज आहे असे मला आजिबात वाटत नाही.
फक्त गरज आहे स्वतः मधील आत्मविश्वास जागृत करण्याची. आता थोडं स्वतःच्या मनाला विचारा, मी कसा आहे ? माझी संगत कशी आहे ? मी व्यसनी आहे का ? मी निवडलेला रस्ता माझ्या निवडीने शोधला का ? मी पूर्णपणे प्रयत्नवादी आहे का ? माझ्या मनामध्ये सकारात्मकता नेहमी असते का ? मी त्या फळाची चातकाप्रमाणे वाट बघतो ते प्राप्त होण्याकरिता लागणारे कष्ट मी केले का ? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये डोकावून पाहण्याची गरज आहे. त्यातूनच आपल्याला स्वतः बद्दलचा आत्मविश्वास निर्माण होवू शकतो. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं पाणी आत येऊ दिल तर ते पाणी जहाजाला बुडविल्याशिवाय राहू शकत नाही.
म्हणूनच आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. नकारात्मक विचार हा नेहमी घातक असतो. तो आपल्याला नक्कीच बुडवू शकतो. अभ्यास करताना नेहमी सकारात्मक विचार करावा की, मला हे नक्कीच जमेल. आत्मविश्वास वाढवा, नेहमी प्रयत्नशील रहा, अपयश आले तरी प्रयत्न सोडू नका यश तुमचेच आहे.