|| जगवा जगाचा पोशिंदा ||
‘साद’ म्हणजे साथ होय. जगभरातील सर्व गरजूकरीता झटणारा, मुख्य अन्नदाता म्हणून ज्याची ओळख जगभरातील माणसासाठी सर्वात मोठा उपयोग असणारा हा ग्रामीण भागातील एक लोकोपयोगी घटक या अनेक माध्यमातून आपण ज्याचे वर्णन करु शकतो ती म्हणजे बळीराजा म्हणजेच शेतकरी होय.शेतकरी म्हटले की, त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे एकच अंतिम ध्येय असते, आणि ते म्हणजे शेतात राब राब राबणे, शेतात कष्ट करून आपणास जे काही पिकवता येईल, ते सर्व पिकवणे शेतातील धान्य पिकवून ते इतरांसाठी उपयोगी ठरवण्याचे महत्वाचे काम हा बळीराजा करत असतो. अशा या बळीराजाला विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
“बंदे, है हम उसके
हमपे किसका जोर,
उम्मीदों के सूरज
निकले हैं चारों ओर “
या हिंदी पद्य कवितेतून शेतकऱ्यांच्या मुलाची व्यथा आपल्या लक्षात येते. शेतकऱ्याच्या मुलाला त्याच्या आयुष्यात कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या समस्यांतून बाहेर पडण्यासाठी ते काय काय करतात ? हे सर्व आपण पाहिले पाहिजे.”कधी प्रकाश तर कधी काळोखासारखा अंधार” ज्याच्या आयुष्यात असतो. त्या शेतकऱ्याला कधी काही वाटत नसेल का ? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आज पर्यंत आपण ज्याला ‘जगाचा पोशिंदा’ म्हणून ओळखतो, तो काहीही न बोलता या धरतीमायेची एक प्रकारे सेवा करत असतो. अशा या शेतकऱ्याच्या कष्टाचे आपण कोणत्यातरी प्रकारे आपण ऋण फेडले पाहिजेत. शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी अनेकदा सांगितली असे विविध महात्मे होऊन गेले.
“किती राबू या मातीत,
कधी तरी होऊल मातीच”
अशा अनेक काव्यांतून आपल्याला शेतकऱ्याच्या जीवनाची माहिती मिळवता येते.आता आपण या शेतकऱ्याचे दुःख समजून घेतले पाहिजे. त्याच्या कष्टाचा भार आपण घेतला पाहिजे. त्याच्या कष्टाचे आपण फळ खातो. त्यामुळे आता तरी त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले पाहिजे. आता प्रत्येकाने शेतकरी कुटुंबातील समस्यांचा बारीकपणाने विचार केला पाहिजे शेतात कष्ट करण्याचा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. कारण त्याशिवाय शेतात कष्ट करताना होणाऱ्या वेदना अनुभवायला मिळणार नाही. यासाठीच शेतकरी हा महान वर्ग मानला जातो.
आजच्या युगात आज प्रत्येक व्यक्तीने या शेतकऱ्याचा आत्मसन्मान केला पाहिजे त्याला आदर दिला पाहिजे जर कधी हा पोशिंदा राहिलाच नाही तर काय होईल ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. जर या शेतकऱ्याने कधी काही पिकवलेच नाही, तर त्याचे काय होईल ? पाण्याच्या समस्यांमुळेच तसेच अनेक समस्यांमुळे शेतात जर काही पिकले नाही, तर या अवघ्या जगाचे पोषण कोण करेल ? अवघ्या जगाच्या या पोशिंद्याला आपण सहकार्याची विशेष साथ दिली पाहिजे. सहकार्य म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या घरापर्यंत पाण्याची सुविधा उपलब्ध करून देता आली पाहिजे. पाण्याच्या विविध माध्यमांतून या शेतकऱ्याच्या शेताला आपण पाण्याचा पुरवठा केला पाहिजे. या शेतकऱ्याच्या घरात आपण लाईटची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे.
शेतकऱ्याच्या जीवनात आपण सुखाचा पाऊस पाडला पाहिजे. शेतकऱ्याच्या जीवनात विविध प्रकारचे रंग भरले पाहिजे. शेतकऱ्याच्या या आयुष्यात आपण अनेक मदतनीस म्हणून ठरले पाहिजेत. त्यांना विविध मार्गांनी त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे शेतकरी हा अनेक समस्यांच्या माध्यमातून कडक बनलेला असतो. आपणही कडक बनण्याची वृत्ती या शेतकऱ्याकडून आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगभरातील विविध लोकांसाठी आपण या शेतकऱ्याचे प्राण वाचवले पाहिजे. शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण या जगाचे कल्याण साधू शकतो त्यामुळे आपण या शेतकऱ्याला वाचवले पाहिजे. शेतकरी कुटुंबांना विविध प्रकारे आपण मदत केली पाहिजे.