आम्ही तुम्हाला या पोस्टद्वारे ईश्रम कार्ड (e shram card ) नोंदणी, ईश्रम कार्ड (e shram card ) चे फायदे, ईश्रम कार्ड (e shram card ) पेमेंट स्थिती, आणि ईश्रम कार्ड (e shram card ) अपडेट, डाउनलोड कसे करायचे यासंबंधी आवश्यक असलेली सर्व माहिती देणार आहोत.यासाठी तुम्हाला कोणत्याही सार्वजनिक सेवा केंद्रांना भेट देण्याची गरज नाही; फक्त सरकारने देऊ केलेल्या सुविधेचा आपण सर्वांनी लाभ घ्या. तुमचे ईश्रम कार्ड नोंदणी स्थिती eshram.gov.in या पोर्टलवर पाहू शकता.तुम्ही घरी बसून eshram.gov.in या पोर्टलवर तुमचे ईश्रम कार्ड बनवू शकतात.
E Shram Card | ईश्रम कार्ड
ई श्रम कार्ड : पंतप्रधान मोदींच्या सरकारने असंघटित उद्योगांमध्ये काम करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी एक अभिनव योजना आणली आहे. खरे तर मोदी सरकारने कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन ईश्रम प्लॅटफॉर्म सुरू केला होता. eshram.gov.in हे पोर्टल सुरू झाल्यापासून कर्मचाऱ्यांनी यासाठी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत २ कोटींहून अधिक कामगारांनी नोंदणी केली आहे. सर्व कामगारांना सरकारी योजनेतून लेबर कार्ड (ई श्रम कार्ड) मिळत आहे, जे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे.
देशाचे काम करणारे नागरिक जे आर्थिकदृष्ट्या असुरक्षित आहेत आणि त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यांना सरकारचा मोठा पाठिंबा आहे. देशभरातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी एक नवीन कार्यक्रम सुरू करून मोदी सरकारने ही वचनबद्धता पूर्ण केली आहे. देशाच्या श्रमशक्तीच्या गरजा लक्षात घेऊन ई-श्रम पोर्टलची स्थापना करण्यात आली.
ईश्रम कार्ड नोंदणी प्रक्रियेद्वारे सर्व कर्मचाऱ्यांना ईश्रम कार्ड दिले जाते, जे सध्या देशात कार्यरत असलेल्या सर्व कामगारांसाठी हे ईश्रम कार्ड महत्त्वपूर्ण आहे. देशातील सर्व कर्मचारी ज्यांच्याकडे हे कार्ड आहे ते सरकारद्वारे प्रदान केलेले श्रम कार्ड लाभ मिळविण्यास पात्र आहेत.
E Shram Card Benefits | ईश्रम कार्ड चे फायदे
- ईश्रम कार्ड (e shram card ) हि योजना केंद्र सरकार ने 26 ऑगस्ट 2021 ला सुरु केलेली आहे.
- ईश्रम कार्ड (e shram card )योजनेत लाभार्थींना 2 लाख रुपये अपघाती मृत्यूची बीमा प्रदान केली जाईल.
- ईश्रम कार्ड (e shram card ) योजना 2022 मध्ये भारत सरकार ने 404 करोड रुपये का बजेट पास केलेले आहे.
- असंगत क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकार श्रमिक ई श्रम योजना अर्ज करू शकतात.
- आयकर भरणारा कोणताही व्यक्ती ई श्रम कार्ड अर्ज करण्यासाठी पात्र नाही.
- कर्मचारी भविष्य निधि संघटना (EPFO) आणि कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) सदस्य देखील सरकारची ई-श्रम कार्ड योजना समाविष्ट नाहीत.
याशिवाय सरकार ने ही घोषणा केली आहे की जे eshram.gov.in या पोर्टलवर नोदणी करतील त्यांना अनेक योजना लाभदायक ठरतील. या मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PMSYM), प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) और प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) इत्यादी समाविष्ट आहेत.
E Shram Card Eligibility | ईश्रम कार्ड बनवण्यासाठी पात्रता
ई श्रम कार्ड योजनेचा लाभ मिळविण्यासाठी काही पत्रतात आहेत .
- तुम्ही भारताचे कायमचे नागरिक असणे आवश्यक आहे.
- तुमच्याकडे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने जारी केलेले आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- तुम्ही आयकर भरणारे नसावे.
- लाभार्थीचे वयोगाट हे 16 ते 60 वर्ष इतके असावे.
- ई-लेबर पोर्टलवरील ई-लेबर कार्ड योजनेसाठी नोंदणी शुल्क CSC मध्ये प्रति नोंदणी 20 रुपये असेल तर अर्ज शुल्क विनामूल्य आहे.
- तुम्हाला ई-श्रम योजनेसाठी त्याच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा लागेल, म्हणजे eshram.gov.in.
- तुमच्याकडे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत आधार कार्डसह बँक खात्याशी लिंक केलेला मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.
- याशिवाय नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासासोबतच काही छोटी कामे केली तर त्याला त्याचे ईश्रम कार्डही बनवता येईल. यासाठी त्याचे वय किमान १६ वर्षे असावे. तरच तो विद्यार्थी ई-
- लेबर कार्ड बनवून याद्वारे उपलब्ध असलेल्या मदत आणि इतर योजनांचा लाभ घेऊ शकतो.
E Shram Card Apply | ईश्रम कार्ड कसे बनवावे.
- ईश्रम कार्ड मिळविण्यासाठी, तुम्ही प्रथम पोर्टलवर स्व-नोंदणी करणे आवश्यक आहे; तुम्हला नोंदणी करण्यासाठी, eshram.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- eshram.gov.in च्या मुख्यपृष्ठावर तुम्हाला ‘register on e-shram’ हा पर्याय दिसेल तेव्हा “‘register on e-shram’ या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ; तुमचा आधार लिंक असलेल्या फोन नंबर येथे एंटर करा, तसेच कॅप्चा पूर्ण करा आणि नंतर send OTP या पर्याय वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला आणखी माहितीचे फॉर्म भरावे लागतील ,ते सगळे फॉर्म भरावे.
- तुम्हाला काही माहिती देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण आवश्यक आहे. यामध्ये घराचा पत्ता , शैक्षणिक पात्रता, नोकरी, व्यवसाय, बँक खाते इत्यादी माहिती समाविष्ट असते. हि सर्व माहिती अचूकपणे भरा, त्यानंतर send
- OTP या पर्याय वर क्लिक करा.
- त्यानंतर, तुम्हाला एक OTP प्राप्त होईल आणि तुम्ही तो प्रविष्ट केल्यानंतर, तुमचे कार्ड स्क्रीनवर दिसेल ज्यामध्ये QR कार्ड देखील आहे. यानंतर तुमचे ई-श्रम कार्ड स्व-नोंदणी पूर्ण होईल.
सर्व नोंदणीकृत कामगारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचे सर्व लाभ घेण्यासाठी 12 अंकी क्रमांक मिळेल तसेच त्यांना ई-श्रम कार्ड प्रदान केले जाईल.
E Shram Card Apply | ईश्रम कार्ड साठी लागणारे कागदपत्रे
- कामगाराचा मोबाईल नंबर
- पत्त्याचा पुरावा
- तुमचे वय प्रमाणपत्र
- कामगाराचा आधार क्रमांक
- आधार क्रमांक लिंक मोबाईल नंबर
- बचत बँक खाते क्रमांक किंवा IFSC कोड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- शिधापत्रिकेशी संबंधित सर्व माहिती
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
शोधमराठी वरील E Shram Card Benefits | ईश्रम कार्ड चे फायदे हा लेख कशा वाटला हे तुम्ही नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.. आशी अधिक माहिती पाहण्यासाठी व ती माहिती वाचत राहण्यासाठी सर्व मराठी बांधवांनी आमच्या शोधमराठी या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आजच सामील व्हा…… Shodhmarathi Whatsapp Group link
धन्यवाद…….
This excellent website certainly has all the information I needed concerning this subject and didn’t know who to ask.