Tourist Places In Pune In Marathi | पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं

 || पुणे जिल्हा ||

Tourist Places in Pune In Marathi ,pune,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi
Tourist Places in Pune In Marathi

शनिवार वाडा  

शनिवार वाडा ,पुणे,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi,Tourist Places in Pune In Marathi
शनिवार वाडा ,पुणे

आज आपण पुण्यातील शनिवार वाडा विषयी माहिती पाहणार आहोत. शनिवार वाडा आहे महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पूर्वीच्या मराठाशाही वस्तूकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून या शनिवार वाड्याकडे पाहिले जाते. भारत सरकारने या वाड्याला 17 जून 1919 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सौरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.
आहे

शनिवार वाडा हे ठिकाण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथे स्थित आहे. इसवी सन 1732 मध्ये पहिला बाजीराव पेशवे यांनी हा राजवाडा बांधला होता. या राजवाड्याच्या बांधकाम सुरुवात करण्याचा वारआणि काम पूर्ण झालेला वार हा शनिवार असल्याने या राजवाड्याला शनिवार वाडा असे नाव ठेवण्यात आले आहे. असे मानले जाते हा राजवाडा पूर्णपणे दगडामध्ये बांधला आहे.

या राजवाड्याची रचना आपल्याला प्रसन्न करणारी आहे. या राजवाड्याच्या भिंतीची उंची 21 फूट इतकी आहे. शनिवार वाड्याला दिल्ली दरवाजा, खिडकी दरवाजा, मस्तानी दरवाजा, गणेश दरवाजा ,जांभूळ दरवाजा असे पाच दरवाजे व नऊ बुरुज आहेत. दिल्ली दरवाजा हा मुख्य दरवाजा म्हणून आज देखील त्याचा वापर होतो. शनिवार वाड्यामध्ये मुघल स्थापत्य शैलीची दर्शन तसेच फुलांचे कोरीव काम पाहायला मिळते.

शनिवार वाडा पाहण्यासाठी सकाळी 8 ते स .6:30 पर्यंत उघडा असतो. काही लोकांचे असे म्हणणे आहे रात्री या राजवाड्यात आत्मा येतात म्हणून ह्या राजवाडा रात्री बंद असतो. शनिवार वाड्याला कसे जायचे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे स्वारगेट बस स्थानकावरून बसने किंवा रिक्षाने जाऊ शकता.

शनिवार वाड्याला एक वेळेस अवश्य भेट द्या.

आगा खान पॅलेस

आगा खान पॅलेस,पुणे,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi,Tourist Places Pune In Marathi
आगा खान पॅलेस,पुणे

आगाखान महाल ही महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक इमारत आहे. हा महल पुणे शहरात स्थित आहे. या महलाचे बांधकाम सुलतान मोहम्मद शहा आगाखान तिसरे यांनी केले होते. इसवी सन 1892 साली या महालाची बांधणी चालू केली होती. या महलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पाच वर्ष इतका कालावधी लागला होता.

या आगाखान महलामध्ये 1942 ते 1944 कालावधी मध्ये महात्मा गांधीजी राहिले असल्यामुळे त्या महलाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हा महल ब्रिटिश सरकारच्या ताब्यात होता. इसवी सन 1942 च्या चले जाव या चळवळीत महात्मा गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना याच महलात नजर कैद करण्यात आले होते. याच महलात कस्तुरबा गांधी व महादेव भाई देसाई मरण पावले असल्याने येथे चार्ल्स कोरिया यांनी तेथे त्यांच्या समाध्या बांधल्या आहेत.

या महालामध्ये गांधीजींच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग घडलेले फलक व त्यांचे स्मारक आज पण आपल्याला पाहायला मिळते. तसेच त्यांच्या काही वस्तू जसे भांडी चप्पल कपडे माळ इत्यादी आजही पहायला मिळतात.

राजा दिनकर केळकर संग्रहालय

पुणे,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi,Tourist Places Pune In Marathi

पुणे येथील राजा दिनकर केळकर हे संग्रहालय विविध प्रकारच्या पुरातन वस्तू ने भरलेले आहे. राजा दिनकर हे पुण्यभूषण पद्मश्री दिनकर गंगाधर केळकर यांनी बांधले आहे पुण्यभूषण  डॉक्टर केळकर यांनी बांधले आहे. पुण्यभूषण डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर यांना कवी अजनातवासी म्हणून ओळखले जाते. या संग्रहालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

या संग्रहालयाचे दरवाजे 1920 मध्ये सर्वांसाठी उघडे करण्यात आले होते. या संग्रहालयात दिवे, अडकीते, गंजिका, सोंगट्या, तलवारी , पेटरे दरवाजे, मूर्ती कात्री, कळसूत्री बाहुल्या अशा भरपूर वस्तूंचा समावेश आहे.

राजा दिनकर केळकर हे संग्रहालय अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे हे आपल्या भारतीय कलाकृतीच्या खजिन्यातील एक खजिना आहे. हे संग्रहालय पुण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवासाच्या करिता हे वैभवशाली पर्यटन स्थळ आहे. या माणसाच्या कल्पकतेला आणि कलेबद्दल आपला प्रणाम आहे.

लाल महाल

लाल महाल ,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi
लाल महाल

लाल महाल ही पुण्यामधील अतिशय सुंदर अशी वास्तू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा लहानपणीचा बरसा काळ या महालातच गेला. महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. पुणे या महालात पुणे महानगरपालिकेने बाल शिवाजी जिजाऊ यांचे सुंदर शिल्प उभारले आहेत. हा महल छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात गालावरती अनेक शत्रूंनी हल्ले केल्यामुळे आज मूळ महाल अस्तित्वात नाही. पुणे महानगरपालिकेने या महालाचे पुनर्भानी करून वस्तू जतन केले आहे.

ही वस्तू पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे. जवळच कसबा पेठ व शनिवार वाडा तसेच कसबा गणपतीचे मंदिर आहे.

जेजुरी

जेजुरी,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi
जेजुरी,Tourist Places Pune In Marathi

जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील एक धार्मिक स्थळ आहे. पुण्याजवळच्या जेजुरी हा सुमारे 30 मेलावर खंडोबाचे देवस्थान आहे. जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. हे ठिकाण उंच डोंगरावर स्थापित आहे. देवळासमोर दगडी दीपमाळ आहेत. या मंदिराला 200 पायऱ्याहून अधिक पायऱ्या आहेत. या डोंगराला नऊ लाख पायरीचा डोंगर असेही म्हटले जाते. सोमवती अमोशाला या मंदिरात खूपच गर्दी असते.

महेश शिव भैरव सूर्य या तिन्ही देवतांचा एकत्र स्वरूप आहे म्हणून याला खंडोबाचा उपवास रविवारी या सूर्याचे वारी करण्यात येतो. ऊस पौर्णिमेनिमित्त जेजुरी येथे गाढवांचा मोठा बाजार भरला जातो.

विकिपीडिया वरील माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

राजीव गांधी प्राणी संग्रहालय

राजीव गांधी प्राणी संग्रहालय,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi,Tourist Places Pune In Marathi
राजीव गांधी प्राणी संग्रहालय,Tourist Places Pune In Marathi

राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे कात्रज मध्ये आहे. मध्ये असल्यामुळे याला कात्रज प्राणी संग्रहालय म्हणून देखील ओळखले जाते. या प्राणी संग्रहालयाची देखभाल पुणे महानगरपालिका करते. तीन भागांमध्ये विभागले आहे. संग्रहालयाची जागा 130 एकर एवढी आहे.संग्रहालयात पक्षाचे संग्रहण सरपटणारे प्राणी तसेच इतर भरपूर प्राणी आहेत. या प्राणी संग्रहालयात पांढरा वाघ बंगाली वाघ आहेत तसेच बिबट्या अस्वल हरण काळवीट माकडे यांचाही समावेश होतो. प्राणी संग्रहालय 2017 मध्ये सिंहाचा एक जोडीचा समावेश केला आहे. प्राणी संग्रहालय सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू असते. या प्राणी संग्रहालया त हिवाळा आणि उन्हाळा हे दोन ऋतू भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने म्हणून मानले जाते.

हे प्राणी संग्रहालय पुणे शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. कात्रज बस डेपो अगदी जवळ आहे. संग्रहालय एक वेळेस अवश्य भेट द्या.

या विषयी अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पुण्यामधील आणखी काही पर्यटन स्थळे आहेत. खालील प्रमाणे…..

शिवनेरी किल्ला
पश्चिमेकडील घाट
पार्वती टेकडी
राजगड किल्ला
तोरणा किल्ला
राजा दिनकर केळकर संग्रहालय
सिंहगड किल्ला
एम्प्रेस गार्डन
पेशवे गार्डन प्राणीसंग्रहालय

तुम्हाला ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका .अशाच नवीन लेखसाठी शोधमराठी शी जुळलेले राहा.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद..

Leave a Comment