|| मागे वळून बघताना…||
२००८ अनेक महत्त्वाच्या घटनांनी गाजलं, त्यात . सर्वात महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे मुंबईवरचा भीषण आत्मघाती हल्ला. या हल्ल्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही अण्वस्त्र संपन्न देशांमध्ये या मुळे तणाव निर्माण झाला. या दोन देशातल्या तणावाचे परिणाम फक्त दक्षिण आशियातच नाहीत तर संबंध जगात उमटतात नाही. हा हल्ला फक्त मुंबईवरचा नाही तर संपूर्ण देशावरचा होता. हल्लेखोर आत्मघाती अतिरेकी पाकिस्तानातून आले होते, हेही आता सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट झालयं. या अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबरला मुंबईत अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. ताज, ट्रायडेन्ट यासारखी हॉटेलं आणि नरीमन हाऊस ही अपार्टमेन्टमध्ये अनेकांना ओलीस ठेवलं.
या अतिरेक्याशी सुरक्षा दलांनी तब्बल ५१ तास झुंज दिली. त्यांना कंठस्नान घातलं. त्यामध्ये एनएसजी, मार्कोस, पोलीस आणि अग्निशमन दल यांनी मोलाचा वाटा उचलला …….…..अतिरेक्यांच्या पहिल्या दिवशीच्या हल्ल्यात ए.टी.एस चीफ हेमंत करकरे, एन्काऊंटर फेम विजय साळसकर आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे शहीद झाले. त्याबरोबर इतर १७ पोलिसांनाही हौतात्म्य आलं …….…..
या हल्यानंतर देशांतर्गत पातळीवर झालेल्या राजकीय उलथापलथीत केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील यांचा राजकीय बळी गेला. देशातल्या प्रत्येक अतिरेकी हल्यानंतर शिवराज पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी व्हायची, मात्र शिवराज पाटलांना पक्षश्रेष्ठींचा भक्कम पाठिंबा होता, मात्र मुंबईवरचा हल्ला एवढा भीषण होता की यावेळी पक्षश्रेष्ठींनीही त्यांची पाठराखण करण्याचं धाडस केलं मुंबईवरच्या हल्ल्यानंतर मुंबईने पहिल्यांदाच विरोधात लोकांचा शांततापूर्ण पण उत्स्फूर्त असा प्रक्षोभ पाहिला. हा प्रक्षोभ एकमेवाद्वितीय असाच होता. त्यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनाही पायउतार व्हावं लागलं……. अजूनही भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाक् युद्ध सुरू आहे.
तसेच जगाचे लक्ष लागलेल्या ऑलिंपिक स्पर्धा चीन मध्ये पार पडल्या यात भारतीय क्रिडापटूंनी यावेळी खरोखरच उल्लेखनीय कामगिरी बजावली. यावेळची सर्वात ठळक कमाई म्हणजे भारताचं पहिलं वहिलं वैयक्तीक सुवर्ण पदक होय. नेमबाजीत अभिनव बिंद्रा याने सुवर्ण पदक मिळवून इतिहास घडवला त्याच बरोबर बॉक्सिंग मध्ये विजेंद्र आणि कुस्ती मध्ये सुशीलकुमार यांनी पदके मिळवली. FARECE त्यापाठोपाठ बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंदनेही आपल्या वर्ल्ड चॅम्पियन शिपचा ताज यावर्षीही ढळू दिला नाही…….. भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना २००८ या वर्षात भारताला जागतिक महामंदीचा फटका बसला. या वर्षीच्या सुरवातीला २१ हजाराचं शिखर गाठलेला शेअर बाजार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे सात हजारांपर्यंत घसरला. गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रूपयांचा धुराळा उडाला……
या मंदीमुळे भारताचा आर्थिक विकास दरही नऊ टक्यांवरून घसरण्याची भिती निर्माण झालीय ।