माझी आई | Mazi Aai

|| प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई ||

माझी आई
माझी आई

‘बोलवू तूज आता, मी कोणत्या उपायी’ माधव जुलियन यांनी आईचे खरेखुरे रूप शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. खरोखर सा-या विश्वात ममतेचे दान देणा-या या परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, म्हणून वात्सल्य सिंधूची पाखर घालण्यासाठी त्याने आईचे रूप घेतले असावे.

‘कुपुत्री जायेद कृचिद आणि कुमाता न भक्ती’

आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग म्हणून आपल्या पोटी जतन करणारी, हाताचा पाळणा बनवून झोपवणारी, काऊ चिऊचे घास घालणारी, प्रेमाचे बोल शिकविणारी, नम्रतेची शौर्याची शिकवण देणारी, व वेळप्रसंगी मुलांच्या हिताकरिता कठोर बनणारी अशी अनंत रूपे आईची आहेत. आईच्या पोटी सा-यांविषयी नम्रता, वात्सल्य व कल्याणाची वृत्ती असते.या जगातील इतिहासात अनेक खेळाडू, तत्त्वज्ञ शास्त्रज्ञ होऊन गेले ते आपल्या घडामोडीत आईचा मोलाचा मोठा वाटा आहे. असे ते आवर्जुन सांगतात. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांच्या मनी रूजले ते म्हणजे शिवाजी व जिजामातेच्या हातून घडलेले एक सुदंर शिल्प साने गुरूजींनी तर ‘श्यामची आई’ अजरामर केली.महात्मा गांधीजींनी संस्काराचे पाठ देणा-या आईचे वर्णन पुढील प्रमाणे केले.

“One good Mother is better than hundred teachers.”

संपूर्ण भारतीय समाज व्यवस्थेला हादरे देणा-या महात्मा फुलेंनी आईचे वर्णन ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती सा – या जगाला उदध्दारी’ या शब्दांत केले आहे. आपल्या भारतीय संस्कृतीने ममतेचे वंदन करण्याचा संस्कारच दिला आहे. आईच्या आशीर्वादाने कार्याला बळ येते. खरोखरच आईचे माणसांच्या आयुष्यातील स्थान काय असते ? ती सा-या कुटुंबाकरिता दिवस रात्र कष्टाचे डोंगर उपसत असते, म्हणून सगळं जग सुखाने विश्रांती घेते. तिच्या कौशल्याने आपण पोटाची भूक भागवत असतो. आणि जिभेचे चोचलेही पुरवत असतो. तिच्या वक्तशीरपणामुळे सारी काम वेळच्या वेळी होतात.

बाबांच्या संकटसमयी हिमतीने साथ देते व मुलांची चूक झाल्यास ती समजावते प्रसंगी कठोर बनून शिक्षाही करते. आपण सत्ता संपत्ती व अधिकार मिळवतो. यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो पण मंदिराच्या पायाला विसरतो.आई-बाप आपली दैवते असतात. आई जवळ असताना आपण तिचे मोल जाणत नाहीत. ती आपल्यापासून दूर गेल्यानंतर तिचे नसणे मात्र मनाला क्लेशकारक वाटते म्हणून म्हणावेसे वाटते, आई खरंच काय असते, दूधावरची साय असते, लंगडयाचा पाय असते.

Leave a Comment