|| नाशिक जिल्हा ||
नाशिक जिल्ह्यामध्ये नैसर्गिक सौदर्य ,प्राचीन मंदिर ,लेण्या असे अनेक पर्यटन स्थळे आहेत.आपण यातील काही पर्यटन स्थळाची माहिती घेणार आहोत.
काळाराम मंदिर
श्री काळाराम मंदिर हे पंचवटी मधील एक प्राचीन मंदिर आहे.श्री प्रभू रामचंद्र आपल्या वनवासमध्ये या जागेवर राहिले होते. म्हणून येथे त्यांचे मंदिर बांधण्यात आले आहे . या मंदिराच्या बांधकामासाठी 2000 मजुरांनी 12 वर्षे खूप कष्ट घेतली तेव्हा ते पूर्ण झाले होते. हे मंदिर 245 फुट लांब व 145 फूट रुंद तर 17 फूट उंच आहे. या मंदिराच्या भितीं पूर्ण दगडात आहेत. या मंदिरातील प्रभुरामचंद्रा सिता लक्ष्मण व हनुमानजी याचे मूर्ती गोदावरी नदीतील काळ्या पाषाणाच्या आहेत म्हणून या मंदिराला काळाराम मंदिर असे ओळखले जाते.
काळाराम मंदिर हे गोदावरी नदीच्या तिरावर बसले आहे. हे नाशिक शहरा पासून अगदी दोन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. काळाराम मंदिरात चैत्र महिन्यात राम नवमीला खूप मोठा उत्सव साजरी केला जातो. हे मंदिर दररोज सकाळी 6 ते रात्री 8 वाजे पर्यंत दर्शनासाठी उघडे असते . काळाराम मंदिर हे नाशिक मधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे.
आपणच या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी या मंदिराला एक वेळेस अवश्य भेट द्या.
मुक्ती धाम
मुक्ती धाम हे नाशिक जिल्ह्यातील नाशिक रेल्वे स्टेशन जवळील एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराचे काम 1971 मध्ये करण्यात आले होते.या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे राजधानी संगमरवरी दगडात करण्यात आले आहे.हे मंदिर खाजगी रित्या चालवले जाते.
या मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती बनवलेल्या असून तसेच मंदिरावरच्या भिंतीवर भगवतगीतेचे 18 अध्याय कोरलेले आहेत. रामनवमी,दिवाळी, दसरा आश्या सणाच्या दिवशी मंदिरात विशेष उत्सव साजरी केला जातात.
पांडव देव लेणी
पांडव देव लेणी याचा प्राचीन दगडी बुद्ध लेण्या मध्ये उल्लेख केला जातो . पांडव देव लेणी ला त्रिरश्मी लेणी म्हणून सुद्धा ओळखले जाते. या लेण्या प्राचीन बौद्ध भिक्षूनी ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात बांधल्या होत्या. या बांधण्याचे मूळ कारण भिक्षूंना ध्यान,अभ्यास आणि राहण्यासाठी त्यांची सोय व्हावी म्हणुन उभारण्यात आल्या होत्या.लेण्याच्या आतील भागातील रचना अतिशय मन मोहनीय आहे . त्यामध्ये छतावर कमळाच्या पाकळ्यांची गुंतागुंतीची रचना अगदी सुंदर वाटते. एक वेळेस अवश्य भेट द्या.
पांडव देव लेण्यापर्यंत कशे जायचे ?
हवाई मार्ग :- 25 किलोमीटर अंतरावर नाशिकचे ओझर हे विमानतळ आहे .या विमानतळावरून खूप टॅक्सी तसेच बसेस पांडव देव लेणी कडे जाण्यासाठी भेटतात.
रेल्वे मार्ग : नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून १३ किलोमीटर अंतरावर पांडव देवी लेण्या आहेत . या रेल्वे स्टेशन वरून लेण्यापर्यंत तुम्ही टॅक्सी किंवा बस करू शकता.
रस्त्याने:- मुंबई -पुणे- नाशिक आणि औरंगाबाद या मुख्य शहरांना जोडणाऱ्या महामार्गाने नाशिक मध्ये येऊ यावे. नाशिक त्रंबकेश्वर या रस्त्यावर या लेण्या आहे. या शहराच्या मध्यभागी आहे .
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर
नाशिक जिल्ह्यातील श्री त्र्यंबकेश्वर मंदिर हे पुरातन काळातील मंदिरावर असुन हे जगात प्रसिद्ध आहे. येथे अनेक भक्त संपूर्ण देशातून दर्शनासाठी येतात. श्री त्र्यंबकेश्वर या मंदिराची रचना अद्वितीय आकर्षक असून काळा शिळे पासून बनलेली आहे.या मंदिराच्या आतील गर्भगृहात एक शिवलिंग आहे.ते शिवलिंग आपल्याला डोळ्याच्या आकारा एवढे दिसते .
या मंदिरामध्ये कालसर्प शांती दोष दूर करण्यासाठी अनेक भक्त येतात.येथे महान पंडित आहेत .ते या दोषाचे निवारण करतात.
हे मंदिर नाशिक शहरापासून अगदी 30 किलो मीटर अंतरावर आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे. तसेच हे मंदिर आठवड्यातील सातही दिवस उघडे असते. मंदिर सकाळी 4:30 ला उघडतात व मंदिराची पहिली आरती 4:30 ला सुरू होते.
तर तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिरा विषयी माहिती कशी वाटली आहे हे आम्हाला कळवा.
सप्तशृंगी मंदिर
सप्तशृंगी मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर वणी आहे. अनेक लोकांच्या असा विश्वास आहे की विश्वाला त्रास देणाऱ्या महिषासुरचा वध करण्यासाठी दुर्गा मातेचे रूप घेतलेले या मूर्तीतून आपल्याला पाहायला दिसते . या मूर्तीचे 18 हात आहेत व विविध शस्रे आहेत . या मूर्तीची उंची 8 इतकी असून स्वयंभू आहे .
हे मंदिर शक्तीपीठापैकी एक अर्धशक्ती पीठ मंदिर आहे. या मंदिराचा उल्लेख रामायणातही सप्तशृंगी पर्वत म्हणून केलेला आहे. राम सीता आणि लक्ष्मण हे वनवासात या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आले असावे. या मंदिरावर अनेक कुंड आहेत कालीकुंड ,सूर्यकुंड ,जलगुफा,शिवतीर्थ ,तांबुलतीर्थ ,काजलतिर्थ,शितकडा इ. आहेत.
विकिपीडिया वरील माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
नाशिक मध्ये आणखी काही पर्यटन स्थळे आहेत. खालील प्रमाणे…..
रामकुंड
सोमेश्वर धबधबा
सीता गुफा
पंचवटी
मांगी तुगी मंदीर
धम्मगिरी
दादासाहेब फाळके संग्रहालय
दुधसागर धबधबा
दुगारवाडी धबधबा
नाणे संग्रहणलय अंजनेरी
तर ही संपूर्ण माहिती कशी वाटली . आशा करतो की आपल्याला ही माहिती आवडली असेल. तुम्हाला ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका .अशाच नवीन लेखसाठी शोधमराठी शी जुळलेले राहा.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद..