सवय मराठी कथा | habit marathi story

सवय | habit marathi story

habit marathi story.शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi,Best Marathi Story

एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. तो पोपट दिसायला खूप सुंदर होता . पोपट हा जन्मल्यापासून एका पिंजऱ्यात राहत होता .पोपटाला त्या पिंजऱ्याची सवय झाली होती. पोपटाला अगदी सवय प्रमाणे  खायला-पियाला वेळेवर भेटायचे. त्याला त्या माणसाने आपली भाषा शिकवून पोपट हा बोलका पोपट बनवला होता. पोपट बोलत असल्याने घरातील लोकांकडून त्याचे कौतुक केले जाई. पोपट मात्र पिंजऱ्यातील पारतंत्र्यात असल्यामुळे खूप ढुख होयाचे .बाहेर फिरणाऱ्या पोपटाला पाहायाचा तेंव्हा पोपट आपली तुलना इतर पोपाटांशी करायचा.आपण कधी बाहेर मनसोक्त उडणार याची त्या पोपटाला आस लागली.

अखेर एके दिवशी पोपटला संधी चालून आली.पोपटाला खाणे देण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडले होते व त्या माणसाकडून ते उघडेच राहिले . माणसाला अचानक काहीतरी काम आल्याने तो लगेच घरून निघून गेला. पिंजऱ्याचे दार उघडे पाहताच पोपट त्या पिंजऱ्यातून सुटून आपली सुटका केली .

सवय लागल्यावर आपण काहीच करू शकत नाही .

त्या पोपटाला लहानपणापासून पिंजऱ्यात रहायची सवय लागली होती. त्यामुळे पोपटाला फारसे नीट उडता येत नव्हते. पोपट एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जायचे म्हणल कि त्याला खूप  त्राश होता. आखिर तो एका झाडवर खूप सारे पोपट बसले होते तिथे तो पोपट जातो. पण पोपट हा परकी भाषेची सवय लागल्या मुले तो त्या पोपटाला हि त्याच भाषेत बोलू लागला. त्याला इतर पोपट आपली भाषा येत नाही .म्हणून त्याला आपला सहकारी मानत नव्हते.अन्नाच्या शोधात तो इकडे- तिकडे भटकू लागला पण त्या पोपटाला अन्न भेटले नाही. कारण त्याला आयते अन्न खायचे सवय लागली होती. तो त्याच्या सवयी चा गुलाम झाला होता. त्याचे जीवन खूप अवघड झाले.

ऊन-वारा पाऊस याची सवय नसल्याने तो पोपट खूप आजारी पडला. आत्ता त्या पोपटला अन्न भेटणे कठीण झाले. तो आजारी असल्यने अन्नाच्या शोधात जाऊ शकत नव्हता. आजार पणा असल्यने तो आपल्या मालकाकडे सुद्धा परत जाऊ शकत नव्हता. त्या पोपटाचा मालक सुद्धा त्या पोपटाला शोधात होता. त्याने खूप पर्यंत केले पण तो पोपट काही सापडला नाही. कारण तो आजारी असल्याने ते एका झाडाखाली पडून होता . त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही .म्हणून तो पोपट खूप दिवस जगू शकाल नाही.शेवटी तो मरण पावला .

तात्पर्य :- जास्त काळ पारतंत्र्यात ( गुलामगिरीत ) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय ( habit ) अंगात मुरून जाते .मग परक्याची भाषा संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्याची जिद्द अंगी राहत नाही .परक्या संस्कृतीचे  चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न  देणे हाच खरा शहाणपणा.   

सवय | habit marathi story हि कथा कशी वाटली हे कळवा.अशाच नवनवीन लेखसाठी शोधमराठी शी जुळलेले राहा.click this link to join my WhatsApp group.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद..

Leave a Comment