|| ‘साद मुलींच्या स्वप्नांना बळ देण्याची’ ||
“मन पाखरु पाखरु त्याची काय सांगू मात
आत व्हतं भुईवर गेलं गेलं आभाळात’
मुलींच मन हे पाखरासारखं आहे. त्यांच्या मनात त्यांची असंख्य स्वप्ने असतात. अगदी उंच-उंच स्वप्ने, तिथे पोहोचण्यासाठी त्यांना अपारकष्ट, जिद्द आणि अनेक संकटांना तोंड दयावे लागले. आज प्रत्येक क्षेत्रात जेवढ्या स्त्रिया उच्चपदस्थ आहेत किंवा त्यांच्या पराक्रमांनी युक्त आहेत. त्यांनी त्यांची स्वप्ने साकारलेली आहेत. धन्यवाद देते त्या माता-पित्यांना की त्यांनी त्यांच्या स्वप्नांना पंख दिले. अंतराळवीर कल्पना चावला, राष्टपती प्रतिभाताई पाटील, झाशीची राणी लक्ष्मीबाई, प्रथम स्त्री-शिक्षिका सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात संगीत, वादन, नृत्य, वर्तृत्व, साहित्य या क्षेत्रांतील निपूण असणाऱ्या, अशी अनेक उदाहरणे की ज्यांच्या पंखांत स्वप्नांचे अनेकविध रंग भरले गेले आजही त्यांच्या कीर्तीचा सुगंध दरवळतो आहे. त्या असामान्य होऊन गेल्या.
“दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे स्वप्नांत
गुंतत जाणे वाटेत भेटत गाणे गाण्यात हृदय झुरायचे झोपाळ्यावाचून झुलायचे I
प्रत्येक मुलगी तिच्या छानशा स्वप्नांत गुंतलेली असते. असंच स्वप्न असत आजच्या सामान्य कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींचं अगदी आईच्या उदरात असल्यापासूनच त्यांच्या मनात असतं स्वप्न ! पण या नाजुक चिमुरडीचं स्वप्नच काय पण तिंचं अस्तित्वही नाकारलं जातंय हे असं का ? आई माझ्या स्वप्नांना तूच दिला होता ना गं थारा, मग माझ्या स्पंदनांना का गं देत नाहीस आसरा ? आईच्या उदरातूनच उत्तुंग स्वप्न पाहणाऱ्या या मादी भ्रुणांना आपण लाखोंच्या संख्येने गर्भातच गुदमरून ठार मारतो. फूल सुकल्यानंतर त्याचा सुगंध विरळ होतो. त्याचप्रमाणे पाखरासारखी उत्तुंग झेप घेण्यासाठी पंखामध्ये बळ असायला हवे. पण ते मिळेलच असे नाही.
“कधी-कधी असं वाटतं स्वतंत्र व्हावं,
स्वप्नांच्या पलिकडे जावं “
कधीच नाही का होणार असं,
जसं मनात येत तसं.”
स्वप्न म्हणजे आपण झोपल्यावर बघतो ते नव्हे, तर स्वप्न म्हणजे जे पूर्ण करण्यासाठी झोप येत नाही. प्रत्येक ‘परी’ तिच्या कल्पकतेप्रमाणे स्वप्न पाहते. पण ध्येय मात्र एकच असते, असं काहीतरी बनावं की समाजाने आपल्याला नजरेन बघावं प्रत्येक मुलीला स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरज आहे ती आई-बाबांच्या साथीची,
“हिम्मत दया थोडी उसळू दया रक्त नकोत
नुसती नाती साथ राहू दया फक्त I
मुलींना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक पावलावर संकटांना सामोरे जावे लागते. आशा निराशेच्या रित्या समुद्रात जशी दुःखाची नाव आहे इथे असतं फक्त भावनांचं वादळ इथे मुलींच्या स्वप्नांना काही किंमतच नाही. इथे सांगण्यापुरती साथ असते. प्रत्यक्षात मात्र काही वेगळेच असते मुलींच जीवन म्हणजे चार भिंतीच्या आतच पिंजऱ्यात ठेवलेल्या पक्ष्याला जशी आकाशात उंच भरारी घेण्याची इच्छा असते मुलींना त्यांचे स्वप्न गाठण्याची
“मला खूप मोठ्ठ व्हायचंय
मला स्वप्न पूर्ण करायचंय
मला उंच उंच जायचंय
संपूर्ण राष्ट्रात नाव करायचंय”
शेवटी जाता-जाता माझ्या माता-पित्यांसमान असणाऱ्या सर्व वडीलधाऱ्यांना मी विनयशीलतेने विनंती करते की, आपण सध्या टि.व्ही, इंटरनेट यामार्फत, ‘साक्षी’ सारख्या मुलींच्या स्वप्नपूर्तीची कहाणी ऐकत, पाहात असाल तिने मेडल मिळवलं पण या मेडलच्या मागची पार्श्वभूमी बघा तिला साथ देणारे आई-बाबा, सहकारी तिच्या पंखांत बळ देणारे तिच्या पाठीशी असणाऱ्या व्यक्ती, आपणही आपल्या मुलींच्या स्वप्नांना पंख दया त्यांनाही उडण्याची संधी दया. एक दिवस असेल ज्या दिवशी साक्षी’ प्रमाणे संपूर्ण देशात नाव झळकेल तुमच्या मुलीचं अभिमानानं बघतील लोक तुमच्याकडे मुलींनी केलेले प्रयत्न वायासारखे उडून जाऊ नयेत, रंगवलेल्या साऱ्या स्वप्नांचे रंग उडू नयेत म्हणूनच “सुखाची स्वप्ने डोळ्यांत लपवावी डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी”.आपली ध्येये, स्वप्ने उंच ठेवावी म्हणजे तिथपर्यंत पोहचेपर्यंत अनेक गोष्टी आपोआप मिळतात.
एकदा काय झाले, इ. ७ वी चा वर्ग होता. सर वर्गात आले आणि त्यांनी प्रत्येक मुला-मुलीला आपलं स्वप्न लिहिण्यास सांगितलं प्रत्येकाने आपल्या स्वप्नांची वावडी उंच-उंच उडविली होती. त्यातील काही मुलींची स्वप्न अशी मला राष्ट्रपती होऊन देशसेवा करायचीय… मला न्यायाधीश होऊन सर्वत्र शांती प्रस्थापित करायचीय.. मला सैनिक होऊन अमर व्हायचंय… मला समाजसेवक होऊन गरीब, अपंग जनतेला आधार दयायचाय… मला डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करायचीयं… अशी उदात्त आणि उत्तुंग असणाऱ्या सुंदर स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी हे २१ व्या शतकातील प्रत्येक वडीलधाऱ्या व्यक्तींनो तुमच्या चिमुकलीच्या स्वप्नांना पंख दया ! “गुज सुखाचे कदी कुणाला आजवरी उलगडले मी शोधते एक गाव स्वप्नांच्या पलिकडले’.