|| गावचा गंध…गावचा सुगंध ||
भारताचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणारे ‘बापू’ अर्थात महात्मा गांधी यांनी आपल्याला ‘खेड्याकडे चला’ असा संदेश स्वातंत्रपूर्व काळात देशातील भारतीय नागरिकांना केला होता. भारत हा देश खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो.गावाचे वातावरण आपण पाहिले तर आपल्याला असे आढळून येईल की, विविध घटकांनी बनलेले पहाण्यास मिळते, येथे पारंपारिक पद्धत आढळून येते येथे प्रामुख्याने व्यवसाय ‘शेती’ हा आहे येथील शेतकरी शेती बरोबर पशुपालन हा जोडधंदा म्हणून करतो. हे एकमेकांशी अवलंबून हा व्यवसाय आहे शेती हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा प्रमुख ‘कणा’ म्हटले आहे.
गावामध्ये विविध प्रकारचे बलुतेदार पद्धत पाहण्यास मिळते विशिष्ट काळात धान्य देऊन त्यांच्याकडून विविध प्रकारचे अवजारे हत्यारे घेत असे उदा. कुंभाराकडून मडके तयार करून घेणे, सुताराकडून लाकडी लोखंडी हत्यारे, चांभाराकडून चप्पला किंवा जोडे तयार करून घेणे, इ. प्रकारचे बलुतेदार पद्धत १६ व्या व १० व्या तसेच यापूर्वी ही पद्धत फारच विकसीत आढळून येते. या काळात परस्पर वस्तू विनिमय पद्धत रूढ होती त्यामुळे त्यातील लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या एकमेकांवर अवलंबून होते. शेतकऱ्यांचा शेती हा व्यवसाय विविध प्रकारचे पिके विविध हंगामात घेतले जात आहे. गहू, ज्वारी, बाजरी इ. पिके शेतकरी दादा घेत असतो. शेतकरी प्रत्येक देशाचा पोशिंदा असतो हे मात्र खरे !
आजचे आधुनिक गाव अर्थात ‘Smart Village कसे असावे. आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार हे गाव आदर्श ठरले ते एक उत्तमच म्हणावे लागेल. पोपटरावांनी सक्तीचे शौचालय बांधण्यास बंधनकारक केले आहे. या गावातील ‘स्वच्छता मिशन खूपच उपयुक्तता ठरले. तेथील परिसर चौहू बाजुने डोंगराने व्यापलेला आहे. यातील परिसर स्वच्छ सुंदर कशाप्रकारे आहे हे एक मॉडेल उदाहरण आहे. या गावाने ‘वृक्ष संवर्धन’ करून वृक्षांचे महत्व अनन्यसाधारण आहे तसेच ‘वृक्ष प्रेम’ या भागातील नागरिकांनी ओळखले आहे. वृक्षांची जनजागृती येथील थोर व्यक्तींनी करून दिलेली हे महत्व अनन्य साधारण आहे.
गावाचे वातावरण निसर्गरम्य सर्वांना हवे हवे असे वाटणारे आहे. येथील व्यक्ती निर्व्यसनी आहे देशातील अनेक गावांना नवे शहरांना ‘आदर्श मॉडेल’ ठरले असे गाव समृध्दीसाठी लोकांमध्ये जनजागृती व प्रबोधन होणे महत्वाचे गावामध्ये शिक्षणाची गंगा वाढत आहे, शैक्षणिक प्रसार महत्वाचा मानला आहे. शिक्षणामुळे माणूस परिपूर्ण होण्यास महत्वाची भुमिका बजावत असतो यातील गावांचा विकास होण्यास मदत होईल. आजकालचे गाव हे डिजिटल होण्यास मदत होत आहे. येथील ग्रामपंचायत डिजिटल पध्दती एकमेकांना कनेक्ट करण्यास सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे पारदर्शक व्यवहार होण्यास खुपच मदत होईल.
भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री त्यांच्या काळात एक आसाधरण योजना केली होते ती पुढील ‘जय जवान, जय किसान’ अशी होती. शेतकरी हा देशाचा कसा आधारस्तंभ आहे. हे आपल्याला पूर्णपणे कळतं शेतकऱ्याविषयी आपण सर्व देशवासी कृतज्ञ असायला हवे भारतीय जनता पक्षाचे सरकार आले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान यांनी असा संदेश दिला अमूल्य अक्षर मंत्र जोडले ते पुढील ‘जय जवान, जय किसान’ जय विज्ञान त्यांनी बळीराजाला आधुनिकतेची कास धरायला लावली. आधुनिक यंत्राचा वापर करण्यास शेतकरी सज्ज असला पाहिजे. गांवचा गंध, गावचा सुगंध, गावात राहून अनुभवाला लागतो.
गाव तेथे माती, गाव तेथे शेती ।
गावचा शेतकरी खऱ्या अर्थाने, देशाचा प्रमुख घटक आहे. गावा-गावात येथील विद्यार्थी शिक्षण घेऊन विकास करून गाव स्वावलंबी करत आहे. येथील शेतकरी तरूण होत आहे तसेच सरपंच पदाची भूमिका नवल वाटणारी आहे. गावामध्ये विविध प्रकारचे सण-उत्साह साजरे केले जातात. त्यापैकी ‘बैलपोळा’ हा सण शेतकरी राजा आपल्या बैलाला नवीन वस्त्र ‘झूल’ अंगावर चढवतात रंगरंगोटी करतात. गावातल्या मंदिरात दर्शनास आणतात. गाजा-वाजा करत मिरवणूक काढतात. बैलाला सूपात गहू, गूळ नैवद म्हणून देतात. गावातील संस्कृती विविधतेने नटलेली आहे. गावामध्ये विविध आपत्तींना शेतकरी बळीराजा समोर जावं लागते. काही आपत्ती हे मानवनिर्मित तर काही नैसर्गिक आपत्ती आढळून येतात. गतवर्षी अख्खा महाराष्ट्र राज्याला भीषण दुष्काळाला सामोरं जावे लागले
. एक भयंकर जगातील इतिहास लिहून ठेवणारी अशी घडली. लातूरला चक्क रेल्वेने पाणी देण्यात आले होते. थोर विचारवंत, व जलतज्ञ शास्त्रज्ञ म्हणतात की तिसरे महायुध्द हे पाण्यामुळे होऊ शकेल अशी महाचर्चा केली जाते. उपाययोजना गरजेचे ठरेल. पाण्याच्या समस्या निर्माण न होण्यास कल्पना, प्रकल्प, योजना हाती घेणे, महत्वाचे ठरेल, पाणी आडवा, पाणी जिरवा, या मोहिमेतून पाणी पातळी वाढण्यास मदत झाली असली तरी कामाला अधिक गती देणे गरजेचे ठरेल. शेती, उद्योग यासह अनेक बाबी पाण्यावरच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परस्पर अवलंबून आहेत. मोठ्या प्रकल्पाशिवाय गावतलाव, पाझरतलाव कोल्हापूर पध्दतीचे सिमेंटचे बंधारे शेततळी, ‘जलयुक्त शिवार’ या योजनाच्या माध्यमातून जिल्हांचा विचार केला असेल तर पाणी साठवण क्षमता कमी नाही. सिंचनवाढीसाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णाहजारे, पोपटराव पवार इ. चे सहकार्य जाणकार नेतृत्वाचं मोठं योगदान आहे.
अकोला तालुक्यात पडणारा पाऊस हा इंचामध्ये मोजला जातो. कर्जत- पारनेर हा पाऊस मिलिमीटरमध्ये मोजला जातो. हा जिल्ह्यातील विरोधाभास आहे शेतकऱ्यांसाठी विहिर हाच दागिना असतो एक विहिर बांधायला साधारणतः साडेचार लाख खर्च येतो. त्यातले साडेतीन लाख सरकार देते. महिन्याभरात टँकरवर चार लाखाचा खर्च होतो. तोच निधी विहिरींसाठी दिल्यास शेतीला उपयुक्त ठरेल. शेततळी तयार करणाऱ्यांकडून दुष्काळाच्या काळात पाण्याची होणारी विक्री थांबायला हवी ती बाब जनगणनेतून समोर येईल कमी पाण्याची पिके. उद्योग सुरु करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रोत्साहन मिळायला हवे.
पाण्याचा विनियोग कसा करायचा हे दाखविणारा उपक्रम जिल्ह्यातील तीन भागात यशस्वी केला. त्यानंतर ‘पाणी माझा स्वयंसिध्द अधिकार’ ही योजना राबवण्याची पाऊस प्रत्येकाच्या शेतात पडतो त्या पाण्यावर त्याच शेतकऱ्यांचा अधिकार असतो एक मिलिमीटर पावसातून सुमारे १० हजार लिटर पाणी मिळते. तथपि साठवण्याची सोय नसल्याने ते वाया जाते.लोकसहभागातून कंपाटमेंट, बंडिग, दगडी बांध सलग समतल चर, माती – नाला बांध, सिमेंट नाला अशी मृदा व जलसंधारणाची कामे झाली आणि जामखेड तालुक्यातील देवपैठण गावची परिस्थिती बदलून गेली. आता परिसरात पाण्याची पाणीपातळी वाढली आहे.
नगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुके दुष्काळी म्हणूनच ओळखले जातात. बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गावातील बहुतांश कुटुंबाचा शेती व्यवसाय, जोडीला शेतकरी दूध व्यवसाय करतात. पाणलोटाच्या माध्यमातून परिस्थिती बदलता येते हे देवदैठणने दाखवून दिले आहे.शासनाचे जलयुक्त शिवार योजना काही गावात प्रभाविपणे राबवली जात आहे. यावर्षी त्याचा लाभ विविध जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून लाभ घेत आहे. रेनवॉटर व्हर्विस्टिंग याचा प्रभावीपणे वापर करणे गरजेचे आहे. त्याची अमलंबजावणी करणे हे नागरिकांचे आद्य कर्तव्य मानावे लागेल. पाणी नियोजनास वॉटर मीटरचा वापर योग्य ठरेल.
शेतकऱ्यांनी कमी पाण्यात व पॉलिहाऊस शेडनेटचा वापर करून शेती करण्याबाबत सरकार सल्ला देत आहे. अनेक शेतकरी पॉलिहाऊस, शेडनेटमध्ये यशस्वी शेती उत्पादन घेतात. पाण्याचे नियोजन करून त्यानुसार पीकपध्दती ठरवावी लागले.पाणी असेल तेव्हा बेसुमार उपसा केला जातो. टंचाईच्या काळात भटकंती केली जाते. पाण्याचा गंभीर प्रश्न सुटण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला गती द्यावी. डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम यांचे स्वप्न, सत्यात खऱ्या अर्थाने सत्यात्य उतरले ते म्हणतात की, देशातील तरुणांनी एक मिशन, मोहिम हाती घेतले पाहिजे, देशातल्या नद्या एकमेकांना जोडल्या तरच आपला देश ‘सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल.
हे काम देशातील युवापिढी, तरुणपिढीच करु शकते असे आवाहन देशातील तरूणांना केले आहे. तरच आपला देश २० – २० ‘महासत्ता’ होईल उत्तरेकडच्या नद्या दक्षिणेकडे कनेक्ट केल्या पाहिजे ‘प्रज्वलित मने’ या पुस्तकामधून विनंती केली आहे. ही खरी त्यांना आदरांजली ठरेल. वाळू उपश्याचेही गंभीर परिणाम लोकांना भोगावे लागत आहे. वाळू उपसा थांबणे अत्यंत गरजेचे आहे.पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी झाडांची लागवड प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे शेततळे, जलसिंचन, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, विहिरीतून होणाऱ्या पाण्याच्या उपसावर नियंत्रण कुपनलिका अति खोल जाऊन न देणे आणि कमी पाण्यात पिके घेण्यासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर आवश्यक आहे.
गावातील किंवा खेडयातील माणसात अद्यापही निरंतर माणूसकीचे नाते खूपच जवळीचे, आपूलकीचे व प्रेमाचे वाटते अनुभवाच्या वर्गात प्रथम श्रेणीचे गणले जाते. आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, माया, वात्सल्य यांच्याकडून आपणास शिकता येतात. विद्यार्थानी सामान्य माणसाचे दुःख दूर केले पाहिजे.
गाव तेथे वात्सल्य,
माती तेथे नाती
काटक तसा कष्टाळू
प्रेम तशी आपुलकेच कडू
निसर्ग तेथे गाव
गाव तेथे स्मार्ट व्हिलेज |