न सांगता येणारा शब्द बाप | Na Sangta Yenara Shabd Baap

|| न सांगता येणारा शब्द बाप ||

बाप
बाप

 

असे म्हणतात आई घराच मांगल्य असते. तर बापही घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खंरच कधी आम्ही समजून घेतलेलं आहे का ? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही लिहिलं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्त्व अधिक सांगितलेलं आहे. नेहमी आईबद्दल चांगले बोलले जाते. परंतु बापा विषयी फारसे कुठे बोलल जात नाही. ज्या  लोकांनी, साधुसंतांनी बापा वीषयी सांगितले त्यांनी पण तापड, व्यसनी,रागीट स्वभावाचा मारझोड करणारा असेच बापाबद्दल सांगितले आहे.  मान्य आहे समाजात तसे बाप असतील देखील पण चांगल्या वडिलांबद्दल काय ?

 

आईकडे अश्रूंचे झरे असतात. परंतु बापाकडे संयम,सहन शक्ती असते. आई रडून मोकळी होते पण सात्वंन वडिलांनाच करावं लागत आणि रडणा-यापेक्षा सात्वन करणा-यावरच जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना ! पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं. रोजच्या जेवणाचीपण सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही सहज विसरून रडते, वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप वाला रडता येत नाही कारणं छोटया भावंडांना जपायच असत गेली तरीही रडता येत नाही. कारण बहिणीचा आधार न असतं. पत्नी अर्ध्यावरच साथ सोडून गेली तर पोरांसाठी आवर घालावा लागतो. आयुष्याश जातो.

 

चटका बसला, ठेच लागली, फटका बसला आईगं! शब्द बाहेर पडतो पण हायवेला रस्ता क्रॉस करतान एखादा ट्रक जवळ येउन ब्रेक अचानक लावतो तेव्हा बापरे शब्द बाहेर पडतो. कारण छोटया संकटासाठी आई चालते एक काय पटन मोठ मोठी वादळं पेलताना बापच आठवतो……. ना?

 

कोणत्याही मंगलप्रसंगी घरातील सर्वमंडळी जातार पण मयताच्या प्रसंगी बापालाच जावं लागत कोणताही बा. श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो पण गरीब लेकीच्या घो उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरूण मुलगा उशिरा वर्ग येतो तेव्हा त्याची आई नव्हे तर बापच जागा असतो. मुलाच्य नोकरीसाठी साहेबापुढे लाचार होणारा बापच असतो. मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बापच असतो. घरच्यांसाठी स्वत:च्या व्यवस्था दडपणारा बापच असतो……. खरचं किती ग्रेट असतो ना?

 

वडिलाचं महत्त्व कोणाला कळतं? लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदा-या खूप लवकर पेलाव्या लागतात त्यांना एकेका वस्तूसाठी तरसावं लागतं. वडिलांना ख-या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी दूरध्वनीवर बोलताना बापाचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो. मुलगी बापाला जाणते इतरांनी सुध्दा असचं आपल्याला जाणावं हीच बापाची किमान अपेक्षा असते

Leave a Comment