लक्ष्मी मराठी कथा (best lakshmi martahi katha)

लक्ष्मी(lakshmi)कथा

सदाचाराने लक्ष्मी (lakshmi) चा वास होतो.

best lakshmi martahi katha,लक्ष्मी मराठी कथा ,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi
लक्ष्मी मराठी कथा

 

best lakshmi martahi katha | लक्ष्मी मराठी कथा

                             महाभारतकालीन एक सत्यदेव नावाचा राजा होता. तो नेहमी प्रमाणे लवकर उठून आपल्या राजवाड्याची पाहणी करत होता .तर त्याला एक सुंदर स्री त्याच्या राजवाड्यातून बाहेर पडताना दिसते .राजाने आश्चर्य चकित होऊन त्या स्रीला हात जोडून नम्रपणे विचारले ,’आपण कोण आहात ‘ त्यावर त्या स्री ने सांगितले कि मी लक्ष्मी आहे .मी आत्ता या राजवाड्यातून जात आहे .तेंव्हा राजा नम्र पणे म्हणतो कि तुम्ही या राजवाड्यातून मान्खुशीने जाऊ शकता .लक्ष्मी राजवाडा सोडून जाते .त्यानंतर लक्ष्मी मागे एक पुरुष राजवाड्याच्या दारातून बाहेर पडतो. राजा त्यालापण नम्रपणे विचारतो ,तर तो उत्तर देतो कि माझे नाव दान आहे .लक्ष्मी सोडून गेल्या नंतर आपण दान करू शकणार नाहीत म्हणून मीही लक्ष्मी सोबत जात आहे.राजाने त्यालाही सांगितले आपण पण जाऊ शकता.

                          या दोघांना बाहेर गेलेले पाहून यश नावाचा तिसरा पुरुष देखील राजवाड्याच्या बाहेर जाऊ लागतो.राजा त्याला पण नम्र पणे विचारतो ‘आपण कोण ‘ का राजवाडा सोडून जात आहात.तर तो तिसरा पुरुष उत्तर देतो कि मी यश आहे लक्ष्मी राजवाडा सोडून गेली , दान राजवाडा सोडून गेला. हे दोघे तुमच्या कडे नाहीत मग कसे काय यश राहणार .म्हणून मी पण जात आहे. राजा ने हे सर्व एकले आणि यशाला नम्र पणे म्हणाला तुम्ही तुमच्या मना प्रमाणे हा राजवाडा सोडू शकता .एवढे येकताच यश राजवाडा सोडून जातो .हे सर्व राजवाडा सोडून गेलेले पाहून जरा थोडा उदास झाला . राजा विचार करू लागल कि आपण यांना काहीच  उत्तर देऊ शकलो नाही . आपण नम्र पणे शांत उभा राहिलो . आता पुढे वाचूया;

सदाचाराने लक्ष्मी चा वास कसा होतो.

राजा राजवाड्याच्या दरवाज्याकडे पाहतो तर काय .आत्ता चोथा पुरुष राजवाडा सोडूण जात होता .तो बाहेर जाणार कि राजाने त्याला हि नम्र पणे विचारले कि ‘आपण कोण ?’आपण का राजवाडा सोडून जात आहेत . तेंव्हा तो पुरुष म्हणाला कि मी सदाचार आहे. तेव्हा राजाने त्याला उत्तर दिले कि मी कधीच तुझा त्याग केला नाही. मग तू का सोडून जात आहेत .लक्ष्मी ,दान आणि यश आदीचा त्याग केला आहे आणि आता तू देखील मला सोडून जात आहे .मी तुला जाऊ देणार नाही ,तू जर मला सोडून गेलास तर माझे सर्वस्व जाईल. राजाचे हे बोल एकूण सदाचाराने राजवाडा सोडण्याचा निर्णय रद्द केला .तो राजवाड्यातच राहू लागला .सदाचार बाहेर पडलाच नाही हे पाहूण बाहेर गेलेले लक्ष्मी ,दान व यश हे पण राजवाड्यात परत आले.

तात्पर्य :-सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे .जीवनात सदाचार ( नितीमत्ता ,धर्माचरण आदी ) नसेल तर दान ,लक्ष्मी , श्रीमंती  आदिचा काहीच उपयोग नाही .

तुम्हाला ही लक्ष्मी मराठी कथा आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा .अशाच नवीन लेखसाठी शोधमराठी शी जुळलेले राहा. व आमच्या शोधमराठी या यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा.

Leave a Comment